Robert Kiyosaki Tweet: ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. सोने, चांदी, बिटकॉइन यांसारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सतत आपल्या कष्टाची कमाई गुंतवण्याचा सल्ला देणारे कियोसाकी गेल्या काही महिन्यांपासून सतत अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि जीडीपीवरील वाढत्या कर्जाबद्दल गंभीर इशारा देत आलेत असून अलीकडच्या एका पोस्टमधून असाच एक गंभीर इशारा समोर आला आहे.

कियोसाकीने दिला धोक्याचा इशारा
अशा परिस्थितीत, कियोसाकी म्हणतात की या परिस्थितीचा जगभरातील गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांच्या आर्थिक भवितव्यावर थेट परिणाम होऊ शकतो. तसेच अमेरिकी सरकार प्रत्येक 90 दिवसांनी सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्सचे नवीन चलन छापत असल्याचा कियोसाकीने दावा केला, ज्यामुळे कागदी चलनाची क्रयशक्ती झपाट्याने कमी होत आहे.
LIC Pension Plan : रिटायरमेंटची चिंता सोडा! एलआयसी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दरमहा 20000 मिळवण्याची हमी;‘स्मार्ट’ पॉलिसी आहे तरी काय?
अशा परिस्थितीत, या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी योग्य मालमत्ता प्रकार निवडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आणि जनतेला बँक बचतीवर अवलंबून राहण्याऐवजी प्रत्यक्ष मालमत्तेमधील गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्तेवर वाढत्या कर्जाचे ओझे
कियोसाकीने आपल्या पोस्टमध्ये पुढे 2008 च्या GFC म्हणजे जागतिक आर्थिक संकटाचा हवाला दिला आणि सांगितले की त्यावेळी अमेरिकेचे एकूण कर्ज 9.5 ट्रिलियन डॉलर्स होते, पण गेल्या 18 वर्षांत चार पटीने कर्जात वाढ होऊन 39 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले.
Crorepati Stock: शेअर कसला हा तर अस्सल सोनं! 12 पैशांचा स्टॉक पोहोचला 48 रुपयांवर, लाखभर रूपये गुंतवणारे झाले करोडपती
कियोसाकीने आपल्या पोस्टमध्ये उदाहरणाने परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यानुसार एखादी व्यक्ती प्रत्येक मिनिटाला 1 डॉलर खर्च करत असेल, तर 1 ट्रिलियन डॉलर खर्च करायला अंदाजे 32000 वर्षे लागतील. म्हणजे जेव्हा एखादा देश दर तीन महिन्यांनी, किंवा 90 दिवसांनी, एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतो, तेव्हा चलनाची क्रयशक्ती झपाट्याने कमी होऊ लागते.
अमेरिकेच्या वाढत्या कर्जाचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम
अमेरिकन जीडीपीवरील वाढत्या कर्जाचा बोजा आणि डॉलरची छपाई यामुळे जगभर महागाईचा भडका उडू शकतो. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांची क्रयशक्तीही कमी होऊ शकते आणि आयातवस्तू महाग होऊ शकतात. मात्र, सोने, चांदी किंवा मौल्यवान मालमत्तेमध्ये आपल्या पोर्टफोलिओचा काही भाग गुंतवून वैविध्यपूर्ण गुंतवणूक करतात असे लोक आपल्या संपत्तीचे महागाईच्या परिणामांपासून संरक्षण करू शकतात.
8th Pay Commission: 18000 हजारांची बेसिक सॅलरी होणार 69000 रुपये? लवकरच होणार मोठा निर्णय; कधी येणार रिपोर्ट? जाणून घ्या टाइमलाइन
त्याचवेळी, कियोसाकीने सांगितले की त्यांनी आपले सोने आणि चांदी अमेरिकेच्या हद्दीबाहेर, स्वित्झर्लंडमधील खाजगी तिजोऱ्यांमध्ये ठेवले आहे. संकट काळात अमेरिकन सरकार खाजगी नागरिकांचे सोने जप्त करू शकते किंवा बेकायदेशीर घोषित करू शकते, जसे इतिहासात पूर्वी घडले आहे असे त्यांचे मत आहे.

