Central Govt Employees News: देशभरात सध्या आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. ऑफिसमधील जेवणाच्या टेबलावर असो किंवा चहाच्या टपरीवर… केंद्र सरकारचे कर्मचारी सतत आपल्या पगारवाढीचा हिशोब करताना दिसत आहेत. कर्मचारी संघटनांनी 3 च्या वर फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाऊ शकतो, पण खरंच शक्य आहे का? चला जाणून घेऊया.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या सॅलरी आणि निवृत्तीवेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. मात्र, अंतिम शिफारशी करण्यापूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा व आर्थिक शाश्वतता यांचा समतोल साधेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फिटमेंट फॅक्टर आठव्या वेतन आयोगाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल, तितकीच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. काही कर्मचारी संघटनांनी 3 पेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी केली असली तरी, बँकबाजारचे सीईओ आदिल शेट्टी यांचे या विषयावर वेगळे मत आहे. येत्या काही महिन्यांत दिल्लीत तसेच इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत पुढील चर्चा आयोजित केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.
‘द मिंट’ला फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होण्याची शक्यता केवळ अटकळ असल्याचे आदिल शेट्टी यांनी सांगितले. 8 व्या वेतन आयोगाने अद्याप आपल्या शिफारसी सादर केलेल्या नाही किंवा कोणतेही संभाव्य आकडे स्पष्ट समोर आलेले नाही. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होण्याची शक्यता केवळ अटकळ असून जास्त फिटमेंट फॅक्टरमुळे सरकारवरील भार लक्षणीयरीत्या वाढेल. परिणामी सरकार सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखले जाईल, असा निर्णय घेईल.
फिटमेंट फॅक्टर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन सुधारण्यासाठी वापरला जाणारा गुणक असल्याने त्यातील कोणत्याही वाढीचा परिणाम बेसिक सॅलरी, निवृत्तीवेतन आणि विविध भत्त्यांवर होतो. परिणामी सरकारवरील वेतन आणि निवृत्तीवेतनाचा एकूण बोजा मोठ्या प्रमाणात वाढतो.
नोव्हेंबर 2025 मध्ये सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली गेली शासकीय मंजुरी आणि शिफारशींनंतर 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जातील. दरम्यान, आठवा वेतन आयोग 2.5 ते 2.86 दरम्यान फिटमेंट फक्टर निश्चित करू शकते, तर 3 किंवा त्यापेक्षा जास्त केवळ एक अटकळ आहे.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा