Gautam Gambhir Head Coach : गौतम गंभीर यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे गंभीर यांना हटवलं गेलं तर त्यांच्या जागी कोण? व्हीव्हीएस लक्ष्मण, एमएस धोनी, आशीष नेहरा आणि वीरेंद्र सेहवाग या चार दिग्गजांची नावं संभाव्य पर्याय म्हणून चर्चेत आहेत. यापैकी कोण होऊ शकतो टीम इंडियाचा नवा कोच?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर गंभीर यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाला वनडे, टेस्ट आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलग पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बीसीसीआय आता गंभीर यांच्या ऐवजी नवीन प्रशिक्षकाचा विचार करणार का? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये फ्लॉप शो
गौतम गंभीर यांच्या कोचिंगखाली भारतीय संघाची सुरुवात वनडे मालिकेतील पराभवाने झाली. त्यानंतर मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून सपाटून पराभव स्वीकारावा लागला. एवढेच नाही तर युनायटेड किंगडम दौऱ्यावर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतही भारताचा सुपडा साफ झाला. यामुळे भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही धोक्यात आले आहे.
लक्ष्मणच्या मार्गदर्शनात भारताचा विजय
दुसरीकडे, बीसीसीआयने जेव्हा जेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे कार्यवाहक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली, तेव्हा संघाने चमकदार कामगिरी केली. आशियाई खेळात सुवर्णपदक जिंकल्यानंतर, अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यावर लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ३-० असा क्लीन स्वीप मिळवला. त्यामुळे शांत, संयमी आणि खेळाडूंशी चांगले संबंध ठेवणारे लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
१. व्हीव्हीएस लक्ष्मण : रेसमध्ये सर्वात पुढे असणारे लक्ष्मण जिथे गेले तिथे त्यांनी भारताला विजय मिळवून दिला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख असल्याने त्यांचा युवा खेळाडूंशी उत्तम ताळमेळ आहे. २. महेंद्रसिंग धोनी : भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी हा कोचिंगसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. धोनीचा अनुभव भारतीय संघाला नव्या उंचीवर नेऊ शकतो. ३. आशिष नेहरा : गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक म्हणून आयपीएल गाजवणारे आशिष नेहरा हेही उत्तम पर्याय आहेत. मात्र, वर्षातील ९ महिने संघासोबत प्रवास करण्यासाठी त्यांना राजी करावे लागेल.
४. वीरेंद्र सेहवाग : सेहवाग यांनी यापूर्वीच थेट ऑफर मिळाल्यास भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा आक्रमक दृष्टिकोन संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.
त्यामुळे बीसीसीआय गौतम गंभीर यांना आणखी संधी देते की थेट नव्या प्रशिक्षकाची घोषणा करते, याकडे आता सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा