Headlines

Crime News: गर्भवती महिला एकाएकी बेपत्ता, नदीकाठी बॉडी सापडली; पोटातलं बाळ गायब, CCTVमुळे गूढ वाढलं


Crime News: होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट घ्यायला गर्भवती घरातून निघाली. पण ती घरी परतलीच नाही. गर्भवती एकाएकी बेपत्ता झाली. तिचा शोध सुरू होता. काही दिवसांनी तिचं शव नदीच्या तीरावर सापडलं.

colombia news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बोगोटा: आठ महिन्यांची गर्भवती तिच्या होणाऱ्या बाळाला गिफ्ट आणण्यासाठी घरातून निघाली होती. तिनं याबद्दलची कल्पना कुटुंबियांना दिली होती. पण काही दिवसांनी तिचं शव नदीकाठी सापडलं. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या पोटातील बाळ गायब होतं. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, नैऋत्य कोलंबियामध्ये राहणारी २१ वर्षीय मारिया कॅमिला पोटोसी गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. ऑगस्टमध्ये तिची प्रसुती होणार होती. कुटुंबानं होणाऱ्या बाळाचं नाव अलाहिया ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच डोहाळे जेवणाची तयारी करण्यात आली होती.
Maharashtra TimesCrime News: हिरे व्यापाऱ्याचं मालीत अपहरण; कुटुंबानं खंडणीपायी 44 कोटी मोजले; 100 कोटींचा विषय सोडवला
१६ जुलैला मारिया नियमित तपासणीसाठी लॉस पोल्वोरिनेस आरोग्य केंद्रात गेली होती. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ च्या सुमारास मारिया डॉक्टरांना भेटली. त्यावेळी ती एकटीच होती. तपासणी पूर्ण होताच मारिया आरोग्य केंद्रातून बाहेर पडली. एका महिलेसोबत दुचाकीवरून जात असताना ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. मारिया दुचारीवर मागे बसली होती. यानंतर ती बेपत्ता झाली. सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

मारियाचे कुटुंबीय आणि पोलिसांनी तिचा अनेक दिवस शोध घेतला. अखेर मेलेंदेज नदीच्या किनारी तिचं शव सापडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकू भोसकून मारियाला संपवण्यात आलं. मारियाच्या पोटातील बाळ गायब होतं. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
Maharashtra TimesUS India Conflict: अमेरिकेचे तीन प्रहार, इराणचा आयकॉनिक टॉवर जमीनदोस्त; भारताचे अब्जावधी रुपये धोक्यात
लेकीचं शव सापडल्याचं कळताच मारियाच्या आई ऍना गोमेज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. बाळ पोटात आहे का, असा प्रश्न गोमेज यांनी विचारला. पण बाळ पोटात नव्हतं. त्यामुळे बाळ जिवंत असल्याची आशा गोमेज यांच्या मनात आहे. मारिया लेकीला जन्म देणार होती. माझ्या नातीला शोधण्यासाठी मत करा, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मारिया तिच्या प्रियकराच्या घरी राहत होती. तेव्हा त्यांना एका महिलेचा कॉल आला होता. एका महिलेसोबत होणार्‍या बाळासाठी गिफ्ट घ्यायला जात असल्याचं सांगून मारिया घरातून निघाली होती. काही दिवसांपूर्वीच मारियाची त्या महिलेसोबत ओळख झाली होती. गर्भवतींसाठीच्या एका सेंटरमध्ये दोघी भेटल्या होत्या. मारिया ज्या महिलेच्या दुचाकीवर बसली होती, तिची ओळख पटली आहे. पण ती अद्याप फरार आहे.