Headlines

Railway RAC Ticket AC Coach Passengers will get Bedroll Blanket Pillow Linen; रेल्वेत AC कोचमध्ये आता थंडीने कुडकुडत बसावं लागणार नाही, RAC प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या


Railway RAC Passenger : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते.

Railway RAC Ticket AC Coach Passengers
आरएसी तिकीट बेडरोल नियम
महेश चेमटे, मुंबई : वातानुकूलित डब्यांतील ‘आरएसी’ (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकिटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंडळाने या डब्यांतील ‘आरएसी’ प्रवाशांना संपूर्ण बेडरोल किट देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.

बेडरोल मिळत नसल्याच्या तक्रारी

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते. मात्र, तिकिटाचे पूर्ण पैसे देऊनही बेडरोल मिळत नसल्याच्या तक्रारी ‘आरएसी’ तिकीटधारकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times100 वर्ष जुनी वास्तू, तीन पिढ्यांचा गोड इतिहास, क्षणार्धात सर्व संपलं, घर कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत; साखरझोपेत सारं घडलं
‘वातानुकूलित श्रेणीच्या प्रवासात (एसी चेअर कार वगळून) ‘आरएसी’ तिकीटधारकांना बेडरोल किट मिळत नसल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून समोर येत आहेत. यामुळे रेल्वे मंडळाच्या सूचनेनूसार या श्रेणीतील ‘आरएसी’ तिकीटधारकांना इतरांप्रमाणेच एक संपूर्ण बेडरोल किट देण्यात यावे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे’, असे पत्र रेल्वे मंडळाचे संचालक लव्ह शुक्ला यांनी काढले आहे. मध्य रेल्वेने सर्व संबंधित अधिकारी, गाडीतील तिकीट तपासनीस (टीटीई), ऑनबोर्ड कर्मचारी आणि हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘प्रवासादरम्यान बेडरोल मिळाला नाही किंवा अपूर्ण बेडरोल देण्यात आला, तर प्रवाशांनी तातडीने गाडीतील ‘टीटीई’शी संपर्क साधावा. तसेच, रेलमदत हेल्पलाइन १३९वर तक्रार नोंदवावी’, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

ठाणे-दिवादरम्यान सात भुयारी मार्ग

पादचारी पुलावर चढणे-उतरणे शक्य नसलेले अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रवाशांना आता भुयारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान सात ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Maharashtra TimesMumbai Goa Highway : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा नाहीच; मुंबई-गोवा हायवेवर माणगाव-इंदापूर बायपास रखडलेलेच, मंत्र्यांकडून झाडाझडती
रेल्वे अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना रूळ ओलांडताना घडतात. रूळ ओलांडण्याला पर्याय म्हणून रेल्वे प्रशासनाने स्थानकात आणि स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारले आहेत. मात्र पुलाची उंची, पायऱ्या चढणे-उतरणे यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि काही प्रवासी त्यांचा वापर टाळतात. वेळ वाचवण्यासाठी किंवा त्रास टाळण्यासाठी प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारतात. त्यामुळे अपघातांचा धोका कायम राहतो. या पार्श्वभूमीवर, भुयारी मार्ग हा सुरक्षित आणि सोयीचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

तीन हजार ६२७ प्रवाशांचा मृत्यू

मध्य रेल्वेने ठाणे-पारसिक, मुंब्रा-कळवा, कळवा-ठाणे आणि दिवा-मुंब्रा या मार्गांदरम्यान एकूण सात भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सात भुयारी मार्गांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत मध्य रेल्वेवर एकूण सहा हजार २२५, तर पश्चिम रेल्वेवर तीन हजार ६२७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुळांवरील मृत्यू कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा