Railway RAC Passenger : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते.

बेडरोल मिळत नसल्याच्या तक्रारी
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना संपूर्ण बेडरोल देण्यात येतो. यात उशी, चादर आणि ब्लँकेटचा समावेश असतो. मात्र, ही सुविधा केवळ कंन्फर्म तिकीटधारकांनाच मिळते. मात्र, तिकिटाचे पूर्ण पैसे देऊनही बेडरोल मिळत नसल्याच्या तक्रारी ‘आरएसी’ तिकीटधारकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
100 वर्ष जुनी वास्तू, तीन पिढ्यांचा गोड इतिहास, क्षणार्धात सर्व संपलं, घर कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत; साखरझोपेत सारं घडलं
‘वातानुकूलित श्रेणीच्या प्रवासात (एसी चेअर कार वगळून) ‘आरएसी’ तिकीटधारकांना बेडरोल किट मिळत नसल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून समोर येत आहेत. यामुळे रेल्वे मंडळाच्या सूचनेनूसार या श्रेणीतील ‘आरएसी’ तिकीटधारकांना इतरांप्रमाणेच एक संपूर्ण बेडरोल किट देण्यात यावे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे’, असे पत्र रेल्वे मंडळाचे संचालक लव्ह शुक्ला यांनी काढले आहे. मध्य रेल्वेने सर्व संबंधित अधिकारी, गाडीतील तिकीट तपासनीस (टीटीई), ऑनबोर्ड कर्मचारी आणि हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘प्रवासादरम्यान बेडरोल मिळाला नाही किंवा अपूर्ण बेडरोल देण्यात आला, तर प्रवाशांनी तातडीने गाडीतील ‘टीटीई’शी संपर्क साधावा. तसेच, रेलमदत हेल्पलाइन १३९वर तक्रार नोंदवावी’, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
ठाणे-दिवादरम्यान सात भुयारी मार्ग
पादचारी पुलावर चढणे-उतरणे शक्य नसलेले अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रवाशांना आता भुयारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान सात ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
Mumbai Goa Highway : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा नाहीच; मुंबई-गोवा हायवेवर माणगाव-इंदापूर बायपास रखडलेलेच, मंत्र्यांकडून झाडाझडती
रेल्वे अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना रूळ ओलांडताना घडतात. रूळ ओलांडण्याला पर्याय म्हणून रेल्वे प्रशासनाने स्थानकात आणि स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारले आहेत. मात्र पुलाची उंची, पायऱ्या चढणे-उतरणे यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि काही प्रवासी त्यांचा वापर टाळतात. वेळ वाचवण्यासाठी किंवा त्रास टाळण्यासाठी प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारतात. त्यामुळे अपघातांचा धोका कायम राहतो. या पार्श्वभूमीवर, भुयारी मार्ग हा सुरक्षित आणि सोयीचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
तीन हजार ६२७ प्रवाशांचा मृत्यू
मध्य रेल्वेने ठाणे-पारसिक, मुंब्रा-कळवा, कळवा-ठाणे आणि दिवा-मुंब्रा या मार्गांदरम्यान एकूण सात भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सात भुयारी मार्गांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत मध्य रेल्वेवर एकूण सहा हजार २२५, तर पश्चिम रेल्वेवर तीन हजार ६२७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुळांवरील मृत्यू कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

