Pune Two Lady Police Officer Marriage in Alandi Cancelled abruptly; सुट्टी काढली, पत्रिकाही छापल्या; पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह अचानक रद्द, ब्रेकमागील कारणांची चर्चा
Pune Two Lady Police Officer Marriage in Alandi Cancelled abruptly; सुट्टी काढली, पत्रिकाही छापल्या; पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह अचानक रद्द, ब्रेकमागील कारणांची चर्चा
Pune Two Female Police Marriage Cancelled : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विवाह सोहळा अचानक रद्द झाल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीयांचा विरोध, वैयक्तिक कारणे की अन्य कारण याची चर्चा सुरु झाली आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित विवाहाला अखेर ब्रेक लागला आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी दोघींनी केली होती. विवाहासाठी दोघींनी पोलिस प्रशासनाकडे सुट्टीचा अर्जही सादर केला होता. मात्र आता हा विवाह रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. विवाह नेमका कोणत्या कारणामुळे रद्द झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एकत्र भरती आणि नियुक्तीही
पोलिस भरतीच्या काळात दोघींची ओळख झाली होती. पोलिस होण्याचे स्वप्न घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाल्यानंतर भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण करुन दोघी पोलिस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघींची मुख्यालयात नियुक्ती होती. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली.
जवळीक अन् एकत्र राहण्याचा निर्णय
याच काळात दोघींमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नात्याला एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचीही चर्चा होती. कुटुंबीयांनी याबाबत पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, दोघींनी विवाहासाठी अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला होता. विशेष म्हणजे या अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावित विवाहाची पोलिस दलासह परिसरात मोठी चर्चा झाली होती.
आता अचानक हा विवाह रद्द झाल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीयांचा विरोध, वैयक्तिक कारणे किंवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
लिंगबदलाशी संबंधित एकीचे वैद्यकीय उपचार
दरम्यान, या दोघींपैकी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. या पार्श्वभूमीवरही त्यांच्या प्रस्तावित विवाहाबाबत चर्चा रंगली होती. मात्र विवाह रद्द होण्याचे कारण याच्याशी संबंधित आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतामध्ये सज्ञान समलैंगिक व्यक्तींमधील परस्पर संमतीने असलेले संबंध गुन्हा मानले जात नाहीत. मात्र, समलैंगिक विवाहाला सध्या कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिस दलासह कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा