Headlines

Rajni Bector Success Story ; Success Story : 300 रुपयांतून केली सुरुवात, आज 7 हजार कोटींचं साम्राज्य; Bector यांचा व्यवसाय विस्ताराचा फॉर्म्युला काय?


सुरुवातीला अपयश येतेच. अपयश आले म्हणून मैदान सोडून पळून जायचं नसतं तर पडल्यावर पुन्हा उभे राहून अडचणींशी सामना करायचा असतो. आज Mcdonalds सारख्या आंतरराष्ट्रीय फूड चेन कंपनीला Buns तसेच इतर काही गोष्टी पुरवणाऱ्या रजनी बेक्टर यांच्या व्यवसायाची सुरुवातच 300 रुपयांपासून झाली होती. 1970 च्या दशकात पंजाबच्या लुधियाना येथे त्यांच्या व्यवसायाची ठिणगी पेटली. अगदी घरातून सुरू झालेला हा व्यवसाय आजच्या पिढीच्या जीभेवरची चव बनली आहे. सुरुवातीला रजनी यांनी आईस क्रीम, कूकीज, केक तसेच बन बनवायला सुरुवात केले. त्याकाळी त्यांनी 300 रुपयाची गुंतवणूक करून एक Oven खरेदी केले. हा Oven त्यांच्या व्यवसायाची खरी सुरुवात ठरला.

सुरुवातीला त्या स्थानिक जत्रेमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स विकू लागल्या. या दरम्यान वस्तूंच्या किंमती ठरवण्याचा अंदाज नसल्यामुळे त्यांना तोट्याचा सामना करावा लागला. पुढे त्यांचे पती Dharmveer Bector यांनी त्यांना मार्गदर्शन दिले तसेच व्यवसाय उभारण्यासाठी 20,000 रुपये दिले. घरातून सुरू झालेल्या छोट्या व्यवसायाला येथून उभारी मिळाली. या पैशातून रजनी यांनी आईस क्रीम युनिट सुरू केला. यात यश मिळाल्यानंतर काही वर्षांनी ब्रेड युनिट सुरू केला. आधी ते दिवसाला 5000 युनिट ब्रेड तयार करू लागले. हळूहळू व्यवसायात वाढ होत गेली. एक वेळ अशी आली की त्यांच्या युनिटमध्ये दररोज 50,000 ब्रेड तयार होऊ लागले.

इथेच रजनी यांच्या Cremica कंपनीने जन्म घेतला. पुढे त्यांचा हा व्यवसाय बिस्किट क्षेत्रामध्येही झेप घेऊ लागला. रजनी यांच्या व्यवसायाला खरी झेप तेव्हा मिळाली जेव्हा भारतात मॅकडॉनल्ड’s ने एंट्री घेतली. रजनी यांची Cremica मॅकडॉनल्ड’s ची बन पुरवठादार बनली. पुढे Cremica ने Quaker Oats सह Joint Venture उभारून केचप तसेच मेयोनीज तयार करण्यास सुरुवात केली.

या कंपनीचे तीनदा नाव बदलण्यात आले होते. 2001 साली कंपनीचे शेवटचे नाव बदलण्यात आले असून ते Mrs Bectors Food Specialities Limited असे करण्यात आले होते. यावेळी फक्त रजनी नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही व्यवसायात उतरले होते. आज कंपनीचे Cremica आणि English Oven असे दोन Brands आहेत. आज त्यांचा व्यवसाय भारताबाहेरही विस्तारला आहे. आज या कंपनीचे बाजारमूल्य 7,890 कोटी रुपये इतके आहे.

Maharashtra Timesआधी इथेनॉल, मग कमी उत्पादन, आता नवे कारण समोर; देशातली प्रमुख साखर उद्योग संस्था स्पष्टच म्हणाली1970 साली अगदी 300 रुपयांच्या Oven पासून झालेली सुरुवात आज हजारो कोटींचा व्यवसाय करत आहे. पंजाबच्या लुधियानाच्या मातीत उभारलेल्या व्यवसायाने आज इतर देशांमध्येही पंख पसरले आहेत. मुळात, 1970 साली सुरू झालेल्या या प्रवासाला मोठ्या साम्राज्याचे रूप घेण्यास अनेक दशके लागली. यामागे रजनी बेक्टर यांच्या ध्येय, जिद्द आणि चिकाटीने तसेच कुटुंबियांच्या पाठिंब्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. 2020 मध्ये Mrs Bectors Food Specialities Limited शेअर बाजारात लिस्ट झाली होती. त्याकाळी आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 540 कोटी रुपये उभारले होते.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत