Headlines

Amravati Fire: स्फोटासारखा मोठा आवाज अन् क्षणात आगीचा भडका; एनआयसीयूमधील परिचारिकेने उलगडला थरार


Amravati District Hospital Fire Infants Death: अवघ्या दहा मिनिटांत सर्व ३९ बालकांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Anderson Phillip Catch - 2026-08-25T094233
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: आम्ही सर्व परिचारिका नेहमीप्रमाणे कामात व्यग्र होतो. मी ड्युटीवरील वरिष्ठांना काही कागदपत्रे दाखवत असतानाच अचानक बॉम्बस्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच आम्ही सर्वजण नवजात शिशू अतिदक्षता विभागाकडे धावलो. आत जाऊन पाहिले, तर एका कक्षातील व्हेंटिलेटरमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या,’ असे अमरावती जिल्हा रुग्णालयातील परिचारिका कीर्ती गणवीर यांनी सांगितले. गणवीर यांनी ‘मटा’शी बोलताना या काळीज कापणाऱ्या घटनेचा थरार मांडला.

आग लागल्याचे लक्षात येताच परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका आणि धुराचे लोट वेगाने वाढत गेले. कक्ष पूर्णपणे बंदिस्त असल्याने धुराला बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. अखेर कर्मचाऱ्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. धुरामुळे श्वास घेणे अत्यंत कठीण झाले होते. एक परिचारिका तर धुरामुळे जागीच बेशुद्ध पडली. मात्र, आग बाळांच्या खाटांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रत्येक बाळाला बाहेर काढण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती, असेही कीर्ती यांनी सांगितले.

Maharashtra TimesAmravati Fire : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो‘माझी मुलगी तिथेच दाखल होती. आम्ही सर्वजण झोपलो होतो. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच धांदल उडाली. डॉक्टर आणि परिचारिका चिमुकल्या बाळांना छातीशी कवटाळून धावत बाहेर येत होत्या. बंदिस्त खोलीतून बाळांचे बारीक रडणे ऐकू येत होते; पण धुराच्या लोटांमुळे आत शिरणे कठीण झाले होते,’ या शब्दांत रुग्णालयात दाखल असलेल्या एका चिमुकलीचे वडील तस्लीम खान यांनी अनुभव मांडला.

रुग्णालयातील एनआयसीयू कक्ष चार भागांत विभागलेला आहे. यातील एका विभागात नऊ नवजात बालकांवर उपचार सुरू होते, तर इतर तीन भागांत ३० बालके होती. शॉर्टसर्किट होऊन व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचे समजताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून बचावकार्य सुरू केले. अवघ्या दहा मिनिटांत सर्व ३९ बालकांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Maharashtra TimesAmravati Fire : अमरावतीत NICU मध्ये आग, तीन नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू; स्वतःचा विचार न करता बाळांना वाचवलं, धाडसी नर्समुळे मोठा हाहाःकार टळलारुग्णालयातील एनआयसीयू कक्ष चार भागांत विभागलेला आहे. यातील एका विभागात नऊ नवजात बालकांवर उपचार सुरू होते, तर इतर तीन भागांत ३० बालके होती. शॉर्टसर्किट होऊन व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचे समजताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून बचावकार्य सुरू केले.

अमरावती रुग्णालयातील घटना भीषण आहे. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अन् फायर अलार्मकडे दुर्लक्ष केलं जातं, तुम्हाला काय उपाय सुचतात? कमेंट बॉक्समध्ये सांगा.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा