मुंबई: अभिजीत दिपके हे नाव गेल्या काही महिन्यांपासून देशभरात चर्चेत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे ( CJP ) संस्थापक अभिजीत दिपके यांनी परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे. दिपकेंना पाठिंबा देणारा एक गट आहे तर दुसरा गट त्यांच्यावर टीका करताना दिसतोय. आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिनं अभिजीत दिपकेंच्या इंग्रजी बोलण्यावरून खिल्ली उडवली आहे.
कंगनाने अभिजीत दीपके यांच्या इंग्रजी बोलण्याच्या कौशल्यावरून त्यांना थेट ट्रोल केलं आहे. कंगनानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हायरल रील शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत दीपके यांच्या सार्वजनिक ठिकाणी इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीची तुलना कंगनाच्या एका जुन्या इंग्रजी भाषणाशी करण्यात आली आहे.
शेअर केलेल्या या रीलच्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामध्ये लिहिलंय की,१२वी पास कंगना राणौत विरुद्ध बोस्टन युनिव्हर्सिटीचे सीजेपी दीपके यांची इंग्रजी. एक जबरदस्त आहे, तर दुसऱ्याला रीबूटची गरज आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीलाअभिजीत दीपके इंग्रजीत मत व्यक्त करताना दिसतात, ज्यानंतर कंगनाचा २४ वर्षांची असतानाचा एक व्हिडीओ दाखवला जातो. त्यामध्ये ती हिंदी चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांच्या प्रतिमेवर अतिशय प्रभावी आणि अस्खलित इंग्रजीत बोलताना दिसत आहे.
कंगनाचे प्रत्युत्तर
कंगनानं यापूर्वी अनेकदा कबूल केलं आहे की, बॉलिवूडमधील सुरुवातीच्या काळात तिचं इंग्रजी कच्चं होतं आणि त्यामुळं तिची खिल्ली उडवण्यात आली होती. या रीलवर प्रतिक्रिया देताना तिनं लिहिलं, “चित्रपट माफियांसोबतच्या वर्षांच्या लढाईतून मी हेच शिकले की, कोणत्याही आउटसायडरची इंग्रजी न बोलल्याबद्दल आता थट्टा केली जाणार नाही. २४ वर्षांची असताना, सर्वांसमोर ट्रोलिंग आणि अपमान सहन केल्यानंतरही मी जो संयम, स्पष्टता आणि नम्रता दाखवली, ती स्वतःला एलिट समजणाऱ्या आंट्या कधीच दाखवू शकत नाहीत.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना स्पष्ट केलं होतं की, कॅमेऱ्यासमोर बोलताना ते थोडे संकोचतात किंवा अस्वस्थ होतात. कंगना राणौत आणि सीजेपी नेत्यांमधील हा शाब्दिक वाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून या रीलवरून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये नेटवर जोरदार चर्चा रंगली आहे.
कंगना राणौत आणि सीजेपी नेत्यांमधील राजकीय वादाची पार्श्वभूमी
कंगना विरुद्ध सीजेपी हा वाद काही या रीलमुळे निर्माण झाला नाहीये. दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनावरही कंगनानं अगदी तिखट शब्दांत टीका केली होती. सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनातील जे झी विद्यार्थ्यांना तिनं ‘जनरेशन गटर’ असं म्हटलं होतं. तेव्हाही सीजेपीनं कंगनाच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा