Headlines

Pune Mahamadwadi Laxmi Park Uncle Killed Nephew Father in Law; भाचा गेल्यानंतर सूनबाई भांडून घराबाहेर, मामाचा संताप, सुनेच्या बापाला संपवलं; पुण्यात काय घडलं?


Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या भाच्याच्या सासऱ्याचीच मामाने हत्या केली आहे.

Pune Crime News
पुणे महंमदवाडी पत्नीच्या वडिलांची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : आपल्या भाच्याचा संसार मोडल्याचा राग मनात धरून एका तरुणानं भाच्याच्या सासऱ्याचीच डोक्यात दगड हाणून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. हा थरार रविवारी रात्री साडेदहाच्या आसपास महंमदवाडी परिसरातील लक्ष्मी पार्क लगतच्या टेकडीवर घडला. हत्येनंतर स्वतःच्या अंगावर रक्ताचे डाग आणि गळ्यावर जखम असतानाच आरोपीने थेट काळेपडळ पोलीस स्टेशन गाठले व गुन्ह्याची कबुली दिली.

निष्पापाला जीव गमवावा लागला

या दुर्दैवी घटनेत सैफन बाबूलाल सय्यद (वय ४३, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, हडपसर) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, हनुमंत ऊर्फ सागर सुग्रीव कांबळे (वय २५, रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काळेपडळ चौकीतील महिला अंमलदार विजया जयदीप चव्हाण (वय ३७) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesDhiraj Pardeshi : धीरज परदेशी प्रकरण; CM देवेंद्र फडणवीसांचा आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद, आरोपींना शिक्षा देण्याची ग्वाही देत संतापले

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सैफन सय्यद यांची कन्या सना हिचे लग्न आरोपी हनुमंत कांबळे याचा भाचा लखन काळोखे याच्यासोबत झाले होते. दुर्दैवाने काही काळापूर्वी लखनचे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर सना आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये खटके उडत होते आणि ती सासरी व्यवस्थित राहत नव्हती. रविवारी पुन्हा याच कारणावरून सासरच्या मंडळींसोबत तिचे भांडण झाले आणि ती रागाने जवळच्या जंगलाकडे निघून गेली. सनाचा शोध घेण्यासाठी तिचे वडील सैफन आणि आरोपी हनुमंत हे दोघेही लक्ष्मी पार्कजवळील डोंगरावर गेले होते. तिथे एका सिमेंटच्या टाकीजवळ सनावरून या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात हनुमंतने जवळच पडलेला एक भलामोठा दगड उचलून सैफन यांच्या डोक्यात घातला. या वर्मी घावामुळे सैफन यांचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra TimesPune-Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत

‘मी सैफन सय्यदला मारले आहे’

या भयंकर घटनेनंतर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी कांबळे रडत आणि जोरजोरात ओरडत काळेपडळ पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे सडे उडाले होते. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस विजया चव्हाण यांनी त्याला विचारणा केली असता, ‘मी सैफन सय्यदला मारले आहे,’ अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर रात्रपाळीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना सैफन सय्यद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा