Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Police get data from Mobile Phone Accused Siya and Chetan Entry of Third Person; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; सिया-चेतनच्या मोबाइलमधील डेटा मिळाला, ‘त्या’ मित्राला होती घटनेची कल्पना, तिसरा आरोपी कोण?
Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Police get data from Mobile Phone Accused Siya and Chetan Entry of Third Person; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; सिया-चेतनच्या मोबाइलमधील डेटा मिळाला, ‘त्या’ मित्राला होती घटनेची कल्पना, तिसरा आरोपी कोण?
Pune Ketan Agarwal Murder Case : पुण्याच्या लोहगड किल्ला हत्याकांडातील मृत व्यावसायिक केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले.
लोहगड तरुण व्यावसायिक चेतन अग्रवाल मृत्यू प्रकरण आरोपी सिया चेतन मोबाइल डेटा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात संशयित मुख्य आरोपी असलेली त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून जप्त केलेल्या तिन्ही मोबाइलमधून ‘डिलिट’ करण्यात आलेला ‘डेटा’ पुणे ग्रामीण पोलिसांनी परत मिळवला केला आहे.
दुसरीकडे, चेतन चौधरीची अटक बेकायदा असल्याचा अर्ज त्याचे वकील राधिकेश उत्तरवार यांनी न्यायालयात केला आहे. चेतन चौधरीला २३ जून रोजी दुपारी साडेचारला अटक करण्यात आल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात केला आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी चेतन चौधरीला २२ जून रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास कोंढव्यातील राहत्या घरातून ताब्यात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले होते.
केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ८३) यांचे शनिवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. केतन अग्रवालला न्याय देण्याच्या मागणीसाठी आयोजित मेणबत्ती मोर्चातही ते सहभागी झाले होते. नातवाच्या खून प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली होती. केतनच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा