Headlines

Pune Hinjewadi Sagar Gaikwad Murder Girlfriend Ex Boyfriend kills over suspect Crime News; शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं


Hinjewadi Murder : आरोपी दिनेश आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेले. मात्र शिक्षण सुरु असताना निकिता आणि सागर यांचं अफेअर सुरु झालं. याचाच राग मनात धरुन दिनेशने सागरला संपवल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Pune Hinjewadi Murder Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : हिंजवडी परिसरात प्रेमाच्या त्रिकोणातून घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली, तर तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

तरुणी पीजीत राहण्यासाठी आली

हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री निकिता शिवाजी दनाने ही तरुणी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. तिने पीजी चालकाला सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली राहण्यासाठी उपलब्ध करून दिली.

निकिताच्या खोलीतून आरडाओरडा बाहेर

गुरुवारी दुपारी दिनेश महादेव झांबरे हा पीजीमध्ये आला. त्याने सागरला भेटायचे असून निकिता ही माझी प्रेयसी असल्याचे सांगितले. सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे समजताच दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला. काही क्षणांतच तिसऱ्या मजल्यावरून आरडाओरड ऐकू येऊ लागला. पीजीमधील कर्मचारी आणि इतर रहिवासी धावत वर पोहोचले असता सागर गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने वार करत होता. हल्ला थांबवण्याचा प्रयत्न होत असतानाच आरोपीने निकितालाही बेदम मारहाण केली.

Maharashtra TimesCrime News : सात महिन्यांचा संसार, पतीचं टोकाचं पाऊल, घाबरुन पत्नीनेही मृत्यूला कवटाळलं, पण शेवटी मोठा ट्विस्टया हल्ल्यात सागर गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या निकितावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

शालेय जीवनापासून आरोपीशी प्रेमसंबंध

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. मात्र, शिक्षणादरम्यान निकिता आणि सागर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याचाच राग मनात धरून दिनेशने सागर आणि निकितावर हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Maharashtra TimesVikhroli Crime : घाणेरडी गाणी लावल्याने वाद, जाऊबाईंचं दाराजवळ संतापजनक कृत्य, विक्रोळीत पती-मुलगा गमावलेल्या अंजूचा हादरवणारा जबाबया घटनेत सागरवर लोखंडी रॉडने तब्बल १३ ते १४ वार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पळून जाणाऱ्या आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि हत्येचा प्रयत्न यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हत्येमागील इतर कारणांचा आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा