मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक नवा वाद समोर आला आहे.मराठा व कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सरकारवर जोरदार टीका केली.ज्योती दहीहंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी जरांगे आक्रमक झाले होते.मात्र दहीहंडेंचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करण्यात येत आहे.तक्रारदार सचिन खलसे यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केली असल्याचा दावा केला आहे.”ज्या जागेवर बोगस ओबीसी लढले त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाईसाठी……..आम्ही सज्ज आहोत”, असा इशारा तक्रारदार सचिन खलसे यांनी दिला.