Headlines

अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक प्रत्येक फोटो युनिक, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस – amruta khanvilkar look stunning mid length check skirt


अमृता खानविलकरचा प्रत्येक नवा लूक सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. यावेळी मिड-लेंथ चेक स्कर्ट आणि स्टायलिश टॉपमधील तिचा ग्लॅमरस अंदाज विशेष चर्चेत आला आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरून कौतुक करत कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

Amruta Khanvilkar Glamorous Look
Amruta Khanvilkar Glamorous Look
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या दमदार अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही कायम चर्चेत असते. पारंपरिक नऊवारी साडी असो, इंडो-वेस्टर्न लूक असो किंवा आधुनिक वेस्टर्न आउटफिट, प्रत्येक स्टाईल ती आत्मविश्वासाने कॅरी करते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली अमृता वेळोवेळी तिच्या नवीन फोटोशूट्स आणि फॅशन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो.

अलीकडेच अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मिड-लेंथ चेक स्कर्ट आणि आकर्षक टॉपमध्ये दिसत असून तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची वेगळी पोझ, आत्मविश्वासपूर्ण स्मित आणि एलिगंट स्टाईल पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :- @scintillating_stargazer_, @amrutakhanvilkar)

मिड-लेंथ चेक स्कर्टमध्ये स्टायलिश अंदाज

मिड-लेंथ चेक स्कर्टमध्ये स्टायलिश अंदाज

या फोटोशूटमध्ये अमृताने मिड-लेंथ चेक प्रिंट स्कर्टची निवड केली आहे. या स्कर्टसोबत तिने साधा पण आकर्षक टॉप परिधान केला असून त्याला साजेसा मिनिमल मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईल केली आहे. तिचा संपूर्ण लूक क्लासी आणि मॉडर्न दिसत असून प्रत्येक फोटोमध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू दिसून येतो.

फॅशनच्या बाबतीत अमृता नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसते. यावेळीही तिने साधेपणा आणि ग्लॅमर यांचा सुंदर मिलाफ साधला आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हाईट टिशर्टने पू्र्ण केला लुक

व्हाईट टिशर्टने पू्र्ण केला लुक

अमृता खानविलकरने तिच्या मिड-लेंथ चेक स्कर्टसोबत व्हाईट टी-शर्टची निवड करत साधेपणा आणि स्टाईलचा उत्तम मिलाफ साधला आहे. प्लेन व्हाईट टी-शर्टमुळे चेक स्कर्टचा पॅटर्न अधिक उठून दिसतो, तर संपूर्ण लूकला क्लीन, फ्रेश आणि मॉडर्न टच मिळतो. कॅज्युअल असूनही हा पेहराव अतिशय आकर्षक वाटतो.यासोबतच तिने कमीत कमी अॅक्सेसरीज, हलका मेकअप आणि नैसर्गिक हेअरस्टाईल ठेवली आहे. त्यामुळे तिचा हा लूक अधिक एलिगंट आणि सहजसुंदर दिसत आहे. आरामदायी आणि ट्रेंडी फॅशनचा उत्तम नमुना ठरलेल्या या आउटफिटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, तिच्या या स्टायलिश अंदाजावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रत्येक फोटो ठरला युनिक

प्रत्येक फोटो ठरला युनिक

अमृताने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोत वेगवेगळ्या पोझ आणि एक्सप्रेशन्स पाहायला मिळतात. कधी ती कॅमेऱ्याकडे हसताना दिसते, तर कधी आत्मविश्वासपूर्ण लूकमध्ये उभी असल्याचे दिसते. प्रत्येक फ्रेममध्ये तिचा फॅशन सेन्स आणि फोटोशूटची संकल्पना स्पष्टपणे जाणवते.फोटोंमधील पार्श्वभूमी, प्रकाशयोजना आणि तिचा स्टाईलिंग यामुळे संपूर्ण फोटोशूट अधिक आकर्षक बनले आहे. त्यामुळे प्रत्येक फोटो वेगळा आणि लक्षवेधी ठरत आहे.

सिंपल मेकअपने पूर्ण केला लूक

सिंपल मेकअपने पूर्ण केला लूक

अमृता खानविलकरने या लूकसाठी ‘लेस इज मोअर’ हा फॅशन फंडा अवलंबल्याचे दिसून येते. तिने आउटफिटला साजेसा सिंपल आणि फ्रेश मेकअप निवडला असून त्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून आले आहे. न्यूड बेस, हलका ब्लश, सॉफ्ट आय मेकअप आणि न्यूड शेडची लिपस्टिक यामुळे तिचा संपूर्ण लूक अत्यंत एलिगंट आणि क्लासी दिसत आहे.याशिवाय, तिने केसांची साधी पण आकर्षक हेअरस्टाईल ठेवत कमीत कमी अॅक्सेसरीजची निवड केली आहे. त्यामुळे संपूर्ण फोकस तिच्या स्टायलिश मिड-लेंथ चेक स्कर्ट आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वावर राहतो.

चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे कौतुक केले आहे. “गॉर्जियस”, “ब्युटी क्वीन”, “मराठी इंडस्ट्रीची सर्वात स्टायलिश अभिनेत्री”, “खूप सुंदर”, “एलिगंट लूक” अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.काही चाहत्यांनी तिच्या फॅशन सेन्सचे विशेष कौतुक करत, “तुझा प्रत्येक लूक प्रेरणादायी असतो,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी तिच्या स्मितहास्याचे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा