Pune Baramati Tandalwadi Village Mother and Son Bodies Found in House; वडील कामावरुन घरी आले, दरवाजा ठोकताच आतमध्ये धक्कादायक दृश्य, एकाच घरात माय-लेकाची बॉडी; पुण्यातील घटनेचं गूढ कायम
Pune Baramati Tandalwadi Village Mother and Son Bodies Found in House; वडील कामावरुन घरी आले, दरवाजा ठोकताच आतमध्ये धक्कादायक दृश्य, एकाच घरात माय-लेकाची बॉडी; पुण्यातील घटनेचं गूढ कायम
Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बारामतीमधील तांदूळवाडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरात आई आणि मुलाची बॉडी आढळून आली आहे.
तांदूळवाडी घरात आई मुलाचा मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामतीमधील तांदूळवाडीतील दादा पाटीलनगर परिसरात एकाच घरातून माय-लेकाचे मृतदेह आढळून आल्यानं काल शुक्रवारी खळबळ उडाली. विवेक विजय गावडे (वय 17) हा गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याची आई रमा विजय गावडे (वय 41) या संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळल्या. रमा यांच्या गळ्यावर काळसर व्रण आढळल्यानं या घटनेबाबत संशय अधिक बळावला आहे. ही घटना काल शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजता समोर आली.
नेमकी घटना काय?
विजय रामदास गावडे हे रमा यांचे पती असून ते बारामती एमआयडीसीतील जीटीएन कंपनीत काम करतात. गुरुवारी रात्री ते कामासाठी घराबाहेर गेले होते. काल शुक्रवारी सकाळी ते घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पत्नी रमा आणि मुलगा विवेक यांना आवाज देऊनही घरातून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी शेजारील सूरज भीमराव शिंदे यांना बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा उघडून घरात पाहिलं असता विवेक हा पत्र्याच्या अँगलला सुती दोरीने गळफासघेतलेल्या अवस्थेत आढळला.
त्याचवेळी घरातील दुसऱ्या भागात रमा गावडे या खिडकीजवळ पाठीवर पडलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यांच्या गळ्यावर काळसर व्रणही दिसून आला. यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ नातेवाईकांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर दोघांना बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.
मृत्यूमागचं गूढ कायम
माय-लेकाचा एकाच घरात अशा परिस्थितीत मृत्यू झाल्यानं घटनेचं नेमकं कारण काय, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे. विवेकने गळफास घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसत असलं, तरी रमा यांच्या गळ्यावर आढळलेला व्रण या घटनेला वेगळं वळण देत आहे. मृत्यूचं नेमकं कारण वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे. बारामती तालुका पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला असून, कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे. कऱ्हावागज येथील मूळ रहिवासी असलेल्या गावडे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यातील वेताळ टेकडी परिसरात एका 17 वर्षांच्या मुलाची त्याच्याच जवळच्या मित्रांनी डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील ‘विरोधी गटाचे स्टेटस’ ठेवल्याच्या क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा