अशाप्रकारे, या कराराद्वारे दोन्ही पक्ष प्रकल्पातील नफ्याचा वाटणीचा हिस्सा निश्चित करतात. विकासक प्रकल्प उभारतो, विकतो आणि त्यातून मिळालेला नफा जमीन मालकासोबत वाटून घेतो. अशा परिस्थितीत, जमीनमालकाला आपली मालमत्ता न विकता उत्पन्न कमवण्याची संधी मिळते. दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये JDA मॉडेल वेगाने स्वीकारले जात आहे ज्यामुळे विकासकांना नवीन प्रकल्प मिळवणे आणि जमीनमालकांना मालमत्तेचे मूल्य वाढवणे शक्य होते तसेच नवीन मॉडेल रिअल इस्टेटच्या भविष्यातील एक मोठं क्रांतिकारी ठरत आहे.
जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट काय आहे
जेडीए जमीनमालक आणि बिल्डर म्हणजे डेव्हलपर यांच्यातील भागीदारीसारखा करार असतो. यानुसार समजा आता जमीन तुमच्या मालकीची आहे, पण विकास करण्यासाठी तुमच्याकडे निधी किंवा ज्ञान नाही आणि डेव्हलपरकडे निधी आणि तंत्रज्ञान असते, पण जमीन मिळवण्यासाठी मोठे कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत, JDA मध्ये दोघेही एकत्र काम करतात.
या करारानुसार जमिनीचा मालक जमीन देतो आणि डेव्हलपर फ्लॅट्स किंवा दुकाने बांधतो. त्यानंतर मालकाला पूर्ण प्रकल्पाचा एक, जसे की 40-60% फ्लॅट्स, भाग मिळतो. त्यानंतर डेव्हलपर उर्वरित बाजार किंमतीनुसार फ्लॅट्स विकून नफा कमावतो, ज्यामध्ये जमिनीची नोंदणी करण्याची किंवा प्रकल्पासाठी कर्ज घेण्याची गरज नसते.
JDA मॉडेलचा फायदा कोणाला अन् कसा?
रिअल इस्टेटमध्ये जमीन मालकांना केवळ जागा खरेदी करण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागायचे. यामुळे एखादा प्रकल्प लांबला किंवा बाजारात मंदी आली, तर एकट्यानेच भार सहन करावा लागत नाही. JDA मॉडेलमुळे धोका समान विभागला जातो.
विकासक केवळ बांधकामावर लक्ष केंद्रित करतो, तर मालक बाकी सर्व गोष्टी हाताळतो. यामुळे भांडवली खर्च कमी होतो, प्रकल्पाच्या कामाची गती आणि विक्री वाढते. मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये लोढा आणि प्रेस्टीज यांसारखे मोठे बांधकाम व्यावसायिक याच मॉडेलचा वापर करून उंचच उंच इमारती बांधत असून यामुळे मालकांनाही याचा फायदा होतो, कारण रोख रक्कम देण्याऐवजी त्यांना तयार फ्लॅट्स मिळतात, जे ते भाड्याने देऊ शकतात किंवा विकू शकतात.
JDA मॉडेलचे फायदे काय?
घर खरेदीदारांना जेडीए मॉडेलमुळे 2 मोठे फायदे मिळतात. पहिला म्हणजे चांगल्या ठिकाणी एका नामांकित विकासकाचा प्रकल्प मिळतो, तर दुसरा फायदा विकासकाचा पैसा जमिनीमध्ये गुंतलेला नसल्यामुळे प्रकल्पाची गुणवत्ता आणि वेळेवर वितरण यावर अधिक लक्ष केंद्रित करता येते.
दुसरीकडे, स्थावर मालमत्तेचा किंवा रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवसाय अधिक जोखमीचा मानला जातो. पण JDA अंतर्गत भागीदारी अधिक मजबूत झाल्या असून कायदेशीर करारामध्ये कोणाला किती वाटा मिळेल, मालमत्तेचा ताबा कधी दिला जाईल आणि त्यासाठी लागणारा कालावधी, असं सगळं स्पष्ट नमूद केलेले असते.
या JDA करारानुसार विकासक काम पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्यास दंड आकारला जातो, ज्यामुळे पारदर्शकता वाढते आणि फसवणुकीची शक्यता कमी होते. त्यामुळे लहान शहरांमध्येही लोकं ही रणनीती अवलंबत आहेत. आजच्या काळात JDA इतके लोकप्रिय झाले आहे की विकासक जवळपास 50% प्रकल्प या मॉडेलवर उभारत आहेत.

