Priya Rajvansh : सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंश प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. अभिनेत्रीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाहीये.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचं झगमगतं जग बाहेरून जितकं आकर्षक दिसतं, तितक्याच इंडस्ट्रीमध्ये रहस्यमयी आणि वेदनादायी कथा दडलेल्या आहेत. अशीच एक दुर्दैवी कथा आहे अभिनेत्री प्रिया राजवंशची. प्रियानं आपल्या करिअरमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु तिच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला.
प्रिया राजवंशनं फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं असलं, तरीही तिचं सौंदर्य आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात तिनं स्वतःचं स्थान मिळवलं. ‘हीर रांझा’, ‘हंसते जख्म’, ‘साहेब बहादुर’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘कुदरत’ आणि ‘हाथों की लकीरें’ यांसारख्या चित्रपटातील अभिनेत्रीच्या भूमिकांचं कौतुक झालं.
प्रिया राजवंशचं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांच्यासोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलं. चेतन आनंद हे प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे मोठे भाऊ होते. चेतन आनंद आधीपासूनच विवाहित होते. चेतन आनंद यांनी प्रियाच्या चित्रपट कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९९७ मध्ये चेतन आनंद यांचं निधन झालं. निधनापूर्वी त्यांनी आपल्या संपत्तीचा एक हिस्सा प्रिया राजवंशच्या नावावर केला होता. उर्वरित संपत्ती त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांमध्ये आणि प्रिया यांच्यात वाटली जाणार होती. मात्र, याच संपत्तीमुळे मोठा वाद निर्माण झाला.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
२००० मध्ये बंगल्यात आढळला अभिनेत्रीचा मृतदेह
चेतन आनंद यांच्या निधनानंतर जवळपास तीन वर्षांनी, २००० मध्ये प्रिया राजवंशचा मृतदेह चेतन आनंद यांच्या बंगल्यात आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असावी किंवा अतिमद्यपानामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला गेला. परंतु, पोस्टमॉर्टमनं या प्रकरणाला वेगळेच वळण दिलं. रिपोर्टमध्ये प्रिया राजवंशचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान प्रियाच्या घरात काम करणाऱ्या माला नावाच्या मोलकरणीचं नाव समोर आले. चौकशीदरम्यान मालानं आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली. ही हत्या करण्यासाठी मालाला ४,००० रुपये देण्यात आले होते. तपासात चेतन आनंद यांच्या दोन्ही मुलांवरही गंभीर आरोप झाले. प्रियाची हत्या घडवून आणण्यासाठी त्यांनीच मालाला पैसे दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. नंतर त्यांना जामीन मिळाला. २०११ मध्ये या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली होती, परंतु प्रिया राजवंशच्या हत्येमागील संपूर्ण सत्य अद्याप समोर आलेली नाही. ही घटना बॉलिवूडच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी आणि रहस्यमयी प्रकरणांपैकी एक मानली जाते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा