Headlines

I Am Sorry, तुला थँक्यू म्हणता आलं नाही! आयुष्य आता आधीसारखं नाही, ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी लेक तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट


चर्चेत आली आहे.

Tejaswini Pandit post for Mother:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: ठरलं तर मग या मालिकेतून न चुकता प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली अन्, चाहते आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांच्या निधनाला नुकतंच एक वर्ष झालं. ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी चाहते तसंच इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. लेक आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं देखील अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावुक पोस्ट शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट

तेजस्विनी पंडित हिनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ही शेअर केली आहे. तिनं आई ज्योती चांदेकर यांचा एक सुंदर आणि आठवणीतला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या डायरी वाचताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तेजस्विनीने लिहिलं की, “आई… १ वर्ष झालं! तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये… I Am Sorry, तुला थँक्यू म्हणता आलं नाही…” .आईच्या जाण्यानं तिच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, हेच तिच्या या मोजक्या पण शब्दांतून स्पष्टपणे जाणवत असल्याचं चाहते म्हणत आहेत.

Maharashtra TimesSaif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामवर आरोप निश्चित, लवकरच सुरू होणार खटला
दरम्यान, ज्योती चांदेकर यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ आपल्या अभिजात अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य केलेलं. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास चित्रपट, मालिका आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत पसरलेला होता.

मी सिंधुताई सपकाळ‘, ‘तिचा उंबरठा’, ‘श्यामची आई’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतील त्यांनी साकारलेली ‘पूर्णा आजी’ ही भूमिका घराघरांत लोकप्रिय ठरली होती. तेजस्विनीनं एका मुलाखतीदरम्यान आईच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं होत की, “आईने ज्या-ज्या माध्यमांमध्ये काम केलं, त्या-त्या वर्षीचे सगळे पुरस्कार घरात असायचे. अशा महान कलाकाराच्या पोटी जन्माला येणं हे मी माझं अहोभाग्य समजते. तिनं दिलेला अभिनयाचा आणि संस्कारांचा वारसा मी असाच पुढं नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.”

Tejaswini Pandit post for Mother

Maharashtra TimesPushkaraj Chirputkar Interview: मनोरंजन क्षेत्रातील ‘सिस्टिम’मधील अनेक गोष्टी खटकत होत्या, सगळं सोडून द्यावंसं वाटत होतं; असं का म्हणाला दिल दोस्ती फेम अभिनेता पुष्कराज चिरपुटकर
कलाविश्व आणि चाहत्यांकडून आदरांजली

ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तेजस्विनीच्या पोस्टवर कमेंट करत ज्योतीताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी भावुक होऊन लिहिलं की, ज्योती ताई, तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच अविस्मरणीय राहिला आहे. तू उत्तम कलाकार तर होतीसच, पण माणूस म्हणूनही खूप दिलखुलास होतीस. तू जिथं असशील तिथं सर्वांची मने जिंकत असशील. तर अभिनेता धैर्य घोलप यानं देखील ज्योती चांदेकरांसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तर माय-लेकींच्या या जोडगोळीने ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात एकत्र काम करून प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली होती. आज ज्योती चांदेकर आपल्यात नसल्या तरी त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या आणि तेजस्विनीच्या हृदयात कायम जिवंत राहतील.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा