Pravin Tarde On Aadesh Bandekar : पंढरीच्या वारीत प्रवीण तरडे यांची भेट आदेश बांदेकर यांच्याशी झाली असून वारीत प्रवीण यांनी आदेश यांचं कौतुक केलं आहे.

आता आदेश बांदेकर यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर प्रवीण तरडे यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. आदेश बांदेकर म्हणाले की, ‘प्रवीण तरडे, या आमच्या मित्रानं इतक्या छान पद्धतीने ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा साकारला. त्याच्या सिनेमानं १०० कोटींचा टप्पा पार केला. मला त्याचा खरंच खूप अभिमान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या सिनेमाला जो काही नफा झाला तो त्याने दान केलेला आहे. हे दातृत्व आमच्या जिगरबाज मित्राकडे आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे.’
Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं?
यावर प्रवीण तरडे म्हणतायत की, ‘खरंतर आज आदेशजी भेटणं हे मला माऊली भेटण्यासमान आहे. कारण, मी या क्षेत्रात साधारण २५-२६ वर्षांपूर्वी सुरुवात केली, त्यावेळी आदेशजींनी मला खूप साथ दिली. अक्षरश: संघर्षाच्या दिवसांत आम्ही आदेशजींच्या घरी राहिलो आहोत. आता सोहम हे सगळं वारीचं शूट करतोय. त्यावेळी सोहम अगदी लहान होता. आम्ही सरांकडे जायचो, त्यांच्याकडे राहायचो. त्यामुळे आदेशजी आज तुमच्या रुपाने मला या वारीत माऊलीच भेटलीये. ‘देऊळबंद’ सिनेमाच्या पहिल्या भागात ‘स्वामी समर्थ लय भारी’ या गाण्यात आदेशजी होते. काहीही मानधन घेतलं नाही. दिवस वाढले, तरीही शूटला आले. फक्त स्वामींच्या भक्तीपोटी, माऊली अजून काय हवं? तुमचे खूप खूप आभार.’
Dharmendra Pradhan Resignation : आता मागे हटायचं नाही! धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मराठी कलाकार खुश, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘तुला सांगायला खूप आनंद होतोय, आषाढी एकादशी २५ जुलैला आहे आणि २६ तारखेला मी अक्कलकोटला सगळ्या माऊलींसाठी एक सेवेचा कार्यक्रम करतोय. प्रवीण, तुला खूप शुभेच्छा. मी पहिल्या ‘देऊळबंद’मध्ये होतो, दुसऱ्यामध्ये नव्हतो आता तिसऱ्यामध्ये नक्की मला घे.’ असं आदेश बांदेकर प्रवीण तरडे यांना म्हणाले.
Mahesh Tilekar : अश्विनी भावेंकडून इग्नोर, एका फोनवर दाक्षिणात्य सुपरस्टारचा होकार; महेश टिळेकरांनी सांगितला प्रसंग
त्यावर लगेच प्रवीण तरडे म्हणतायत की, ‘मला खरंच आनंद होईल, पण आदेशजी खरंच बिझी होते. नाहीतर आपण एकत्र काम केलंच असतं. देहू, आळंदी करत पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांबरोबर चालत यायचं आणि उद्या अक्कलकोटला सेवेचा कार्यक्रम हे खरंच खूप छान आहे. माझे आई-वडील सुद्धा दरवर्षी वारीला जातात. मी आणि पिट्या सुद्धा वारीत जमेल तसं सहभागी होतो.’
प्रवीण तरडे यांची पोस्ट
तसेच प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर आदेश बांदेकर यांच्यासोबतचे वारीतले फोटो शेअर करत लिहिलं की, ‘वारी मध्ये सारेच माऊली… पण आदेशजींच्या अचानक झालेल्या भेटीमुळे जाहला सोहळा अनुपम्य…वारीमधील दोनचार दिवस सुध्दा वर्षभर तुम्हाला मातीशी, माणसांशी जोडून ठेवतात…राम कृष्ण हरी माऊली’

