Headlines

Actor Sudhir : अत्याचारामुळे दारूच्या आहारी गेलेल्या पत्नीचं वयाच्या 44व्या वर्षी निधन; एका भयानक घटनेनं बदललं सुप्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य


Actor Sudhir : अभिनेता सुधीर यांच्या पत्नी शीला राय यांच्यावर १९७७ मध्ये सामूहिक अत्याचार झाला होता. त्यांचा मुलगा अशोक बँकर यानं सांगितलं की, या घटनेनंतर शीला दारूच्या आहारी गेल्या आणि वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

Actor Sudhir Painful Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – लोक नेहमी बॉलिवूडची ग्लॅमरस दुनिया पाहतात. पण त्यामागे एक काळी बाजू दडलेली आहे. ज्याच्या कथा ज्यावेळी समोर येतात तेव्हा मन हेलावून टाकतात. अशीच अभिनेता सुधीर यांच्या कुटुंबाची कहाणी आहे. अभिनेता सुधीर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहाय्यक भूमिका साकारली आहे. सुधीर यांचं खरं नाव भगवानदास मुलचंद लुथारिया होतं. त्यांनी ‘मेरी जंग’, ‘दीवार’, ‘खोटे सिक्के’, ‘हरे राम हरे कृष्णा’ पासून ते ‘दोस्ताना’, ‘कालिया’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

सुधीर यांना त्यांच्या चित्रपटांमधून जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढंच दुःख त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात भोगावं लागलं. सुधीर यांची पत्नी एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री होती. एक काळ असा होता जेव्हा चित्रपटसृष्टीत शीला रे यांचं नाव महेश भट्ट यांच्याशी जोडलं गेलं होतं.
Maharashtra TimesShagufta Ali On Govinda : ‘तो आमिर खानपेक्षाही मोठा परफेक्शनिस्ट’, गोविंदाबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीचं वक्तव्य

सर्व काही उद्ध्वस्त झालं

१९७७ मध्ये, सुधीर यांची पत्नी, मॉडेल शीला यांच्यासोबत दुर्घटना घडली. ही घटना त्यांचा मुलगा आणि लेखक अशोक बँकर यांनी उघड केली. ‘टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक यांनी सांगितलं की, त्यांच्या आईवर सामूहिक अत्याचार झाला आणि एका क्षणात त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. शीला यांचं वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झालं.

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

या घटनेचा उल्लेख कोणत्याही एफआयआर किंवा न्यायालयीन खटल्यात नाही. कोणतीही तक्रार कधीच दाखल झाली नाही. कुटुंबानं अनेक वर्षे हे दुःख सहन केलं. अनेक वर्षांनंतर, त्यांच्या मुलानं ही कहाणी उघड केली. अशोकनं ‘ब्युटीफुल अग्ली’ या चित्रपटाद्वारे आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचं चित्रण केलं आहे. ज्यात एका महिलेवर झालेला सामूहिक अत्याचार दाखवण्यात आला आहे. आपल्या भावना व्यक्त करू न शकल्यानं, शीला दारूच्या आहारी गेल्या आणि त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली.
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra मध्ये झळकणार कुशल बद्रिके, दत्तू मोरेसोबत विनोदाची जुगलबंदी; प्रेक्षक उत्सुक

काय घडलेलं नेमकं?

शीला रे यांच्या मुलानं सांगितलं की, त्यांचे वडील चित्रपटाच्या शुटिंगसाठी शहराबाहेर असताना, त्यांची आई मुंबईतील उषा किरण बिल्डिंगमधील एका पार्टीला गेल्या होत्या. त्या दिवशी, चार जणांनी आधी त्याच्या आईला गुंगीचं औषध दिलं आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही, तर त्या चौघांपैकी एक फोटोग्राफर होता आणि त्यानं सामूहिक अत्याचाराचे फोटोही काढले होते.

Maharashtra TimesMaria Susairaj : अभिनेत्रीवर संशय, बॉयफ्रेंडनं कास्टिंग डायरेक्टरला संपवलं, बॉडीसमोरच दोघांनी ठेवले संबंध; इंडस्ट्रीतील चक्रावून टाकणारी घटना
शीला रे यांनी ना तक्रार दाखल केली, ना कोणाला त्या घटनेबद्दल सांगितलं. समाज आपल्यालाच दोष देईल हे त्यांना माहीत होतं. बऱ्याच वर्षांनंतर, त्यांचा मुलगा, अशोक बँकर यानं त्याच्या आईच्या कथेवर आधारित ‘ब्युटीफुल अग्ली’ नावाचा चित्रपट बनवला. सुधीर यांनीही नंतर प्रसिद्धीपासून दूर राहून आयुष्य जगण्यास सुरुवात केली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा