पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही योजना मुलींसाठी विशेष अशी योजना नाही. कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत सुरुवातीची मॅच्युरिटी 15 वर्षांची असते. 15 वर्षानंतर जर खातेदाराची इच्छा असल्यास खाते पुढे 5-5 वर्षांनी वाढवलेही जाऊ शकते. जर तुमचे बचत करण्यामागचे उद्दिष्ट दीर्घ काळासाठी आहे तर पीपीएफ योजना उत्तम पर्याय ठरू शकते. विशेष म्हणजे पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी लवचिक आहे. खातेदाराच्या इच्छेनुसार मॅच्युरिटी वेळेआधी बंद करता येते.
जर तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 2000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर 15 वर्षांच्या मॅच्युरिटीनुसार एकूण बचत 6.51 लाख होऊ शकते. या योजनेत जमा केलेल्या रक्कमेवर 7.1 टक्क्याने व्याज मिळते. त्यानुसार, महिना 2000 रक्कम जमा करून 15 वर्षांनी जमा झालेल्या 6.51 लाख रक्कमेत अंदाजे 2.91 लाख रक्कम व्याज आहे.
सुकन्या समृद्धी योजना
भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना विशेषकरून मुलींसाठी लागू केली आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींच्या नावे हे खाते उघडता येते. तर खातेदार मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर या खात्याची मॅच्युरिटी होते. या योजनेतदेखील मुलगी 15 वर्षांची होईपर्यंत खात्यात रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर पुढील 6 वर्षांसाठी खात्यात जमा असणाऱ्या रक्कमेवर व्याज पुरवण्यात येतो. या योजनेत व्याजदर 8.2% आहे. सुकन्या समृद्धी योजनेत पीपीएफ योजनेसारखी लवचिकता नाही. मुलगी 18 वर्षांची झाली तर गेल्या वर्षापर्यंत खात्यात जमा झालेली 50% रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 2000 रुपयांची रक्कम जमा करत असाल तर खाते मॅच्युर झाल्यावर खात्यात जमा रक्कम 11.09 लाख रुपये होऊ शकते. यात 8.2% व्याजदरानुसार, अंदाजे 7.49 लाख रुपये व्याज आहे.
मोदींच्या विकसित भारताच्या स्वप्नाला मोठे आव्हान! आशियातील सर्वात कमजोर चलन, आर्थिक वाढीचा वेग 8 टक्क्यांच्याही खालीमग बेस्ट पर्याय कोणता?
योग्य पर्याय कोणता? याचे उत्तर तुमची गरज आहे. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे असतील तर सुकन्या समृद्धी योजना योग्य पर्याय ठरेल. तसेच जर तुम्हाला लवचिकता हवी असेल, गरजेला पैसे मिळवण्याची सोय तसेच खात्यातून कर्ज मिळवण्याची सुविधा हवी असेल तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा योग्य पर्याय ठरेल.

