Headlines

Ways To Handle Credit Card Debt ; क्रेडिट कार्डमुळे कर्जबाजारी झाला असाल तर अजिबात घाबरू नका, 3 सोप्या पद्धतींमुळे होता येईल कर्जमुक्त


क्रेडिट कार्ड हे उत्पन्न नाही तसेच त्यातून खर्च होणारी रक्कम आपल्या मालकीची नसते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेली प्रत्येक रक्कम आपल्याला व्याजासहित परत करावी लागते. जर क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्ज वाढले आहे तर अशावेळी मुळीच घाबरून जाऊ नका. काही पद्धतींच्या माध्यमातून या परिस्थितितून बाहेर पडता येऊ शकते.

Credit Card Payment Debt
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
खिशात पैसे नसतील पण एखादी गोष्ट खरेदी करण्याची मनात तीव्र इच्छा असेल अशावेळी क्रेडिट कार्ड उपयोगात येतो. पण क्रेडिट कार्ड वापरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, क्रेडिट कार्ड बँकेद्वारे करण्यात येणारी आर्थिक मदत नव्हे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च केलेला एकएक रुपया कर्ज असतो आणि त्याची परतफेड व्याजासहित करावी लागते.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च केलेले पैसे वेळेवर परत केले नाहीत तर याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. खराब क्रेडिट स्कोअरमुळे खाते डिफॉल्ट होण्याची शक्यता असते. पण महिन्याचे संपूर्ण बिल भरण्याऐवजी त्यावर आकरण्यात येणारी मिनीमम डयू जरी भरली तरी खाते डिफॉल्ट होण्याची प्रक्रिया लांबणीवर ढकलता येते. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या बहुतेकांमध्ये खाते डिफॉल्ट होण्यापासून वाचवण्यासाठी दर महिना फक्त मिनीमम डयू भरण्याची पद्धत वापरली जाते.

मिनीमम डयू भरणे हा पर्याय नाही. ही पद्धत खातेदाराला कर्जाच्या चक्रामधून कधीच बाहेर पडू देणारी नाही. मिनीमम डयू जरी भरण्यात आले तरी बँकेकडून उर्वरित कर्जावर आकरण्यात येणारे व्याज काही थांबत नाही. त्यामुळे देय रक्कम वाढतच जाते. परिणामी, खातेदारावर कर्ज वाढत जातो.

क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे डोक्यावर कर्ज वाढत चाललंय?

क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची एक ठराविक मुदत बँकेकडून देण्यात येते. त्या मुदतीत बिल भरला गेला नाही तर लेट फी तसेच वाढत्या व्याजाचा कर डोक्यावर वाढत जातो. अशा वेळी संबंधित बँकेकडून पुरवण्यात आलेल्या ऑटो पे सुविधेचा लाभ घेता येतो. या सुविधेसाठी खातेदाराने खात्यात रक्कम आधीच जमा ठेवणे आवश्यक असते.

जर आधीच डोक्यावर जास्त कर्ज झाले असेल तर…

  • महिन्याची Minimum Due भरण्यापेक्षा शक्य तितकी जास्त रक्कम भरणे कधीही उत्तम पर्याय ठरेल. कर्जाची रक्कम जितकी कमी होईल तितकी त्यावर व्याजामुळे होणारी वाढही कमी करता येईल.
  • Snowball Method : या पद्धतीत एकापेक्षा जास्त कर्ज असेल तर सगळ्यात अगोदर कमी रक्कमेचे कर्ज टप्प्याटप्प्याने फेडावे. एक कर्ज फिटले तर पुढचे कमी रक्कमेचे कर्ज टप्प्याटप्प्याने फेडावे.

Maharashtra Timesसरकारच्या विशेष बचत योजना! महिन्याला 2000 जमा कराल तर होईल लाखोंचा नफा, समजून घ्या पूर्ण गणित

  • Avalanche Method : वाढत्या व्याजाचा खर्च कमी करायचा असल्यास सगळ्यात अगोदर ते कर्ज फेडण्यास घ्या ज्याचे व्याजदर जास्त आहे. शक्य तितकी रक्कम टप्प्याटप्प्याने पेमेंट करून सर्व कर्ज फेडून घ्या.

क्रेडिट कार्ड ही अतिरिक्त उत्पन्न किंवा बँकेकडून पुरवण्यात आलेली मदत नाही. क्रेडिट कार्ड तेव्हाच वापरा जेव्हा त्यातून होणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा कमी असेल.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा