Headlines

Police constable dies in satara car accident; कर्तव्यदक्ष पोलिस, पण आईसाठी धडपडताना काळाच्या तावडीत; साताऱ्यात कॉन्स्टेबलचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर, नेमकं काय घडलं?


Satara Accident News : वाई पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा सातारा-वाई मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. आजारी आईच्या उपचारासाठी जात असताना हा अपघात झाला. पत्नी गंभीर जखमी असून घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Shravan Rathod, Satara Accident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरवणारी दुर्दैवी घटना सातारा-वाई मार्गावर शुक्रवारी पहाटे घडली आहे. कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पोलिस कॉन्स्टेबल जागीच ठार झाला, तर त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. श्रावण राठोड, असे मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. आजारी आईच्या उपचारासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता साताऱ्याला जात असताना वाटेतच काळाने त्यांना गाठले.

नेमकी कशी घडली ही घटना?

आजारी आईवर उपचाराचा सल्ला घेण्यासाठी श्रावण राठोड हे पहाटे पत्नीसह कारमधून साताऱ्याकडे जात असताना वाकेश्वर-बावधन गावच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे अपघाताची दुर्दैवी घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले श्रावण राठोड हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील आहेत. अपघातात त्यांच्या पत्नी देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाहनाने दिली धडक, वाहनावरील ताबा सुटला

साताऱ्याकडे जात असताना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने श्रावण राठोड यांचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. श्रावण राठोड जागीच ठार झाले तर पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra TimesAditya Thackeray Emotional : भर मंचावर आदित्य ठाकरे भावूक, वर्धापन दिनी शिवसैनिकांच्या अंगावर काटा आणणारा क्षण

नागरकांची वेगळी मागणी, पार्थिव हिंगोलीकडे रवाना

दरम्यान, श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते. गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हातखंडा होता. नुकताच गंभीर प्रकरणातील आरोपी त्यांनी पकडला होता. त्यांचा अपघात आहे की घातपात, याची चौकशी करण्याची मागणी वाईमधील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर श्रावण राठोड यांचे पार्थिव वाई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सहकाऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. साश्रुनयनांनी सहकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावाकडे नेण्यात आले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा