Headlines

PM Modi Saptadhara Viksit Bharat 7 Streams; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची ‘सप्तधारा’ घोषणा, ‘विकसित भारत’चे 7 प्रवाह ‘अर्थव्यवस्थेची नौका’ मजबूत करतील

What is PM Modi’s ‘Saptadhara’ Plan: 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी7 प्रमुख स्तंभांची ओळख पटवली, जे भारताच्या भविष्यातील विकासाला चालना देतील आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला गती देतील.

PM Modi Saptdhara Reforms
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची ‘सप्तधारा’ घोषणा
Prime Minister Modi I-Day Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात ‘विकसित भारत 2047’ च्या दिशेने भारताचा प्रवास गतिमान करण्यासाठी ‘सप्तधारा’ ही 7-सूत्री सुधारणांची रूपरेषा जाहीर केली. यामध्ये उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, डिफेन्स, ग्रीन व ब्लू अर्थव्यवस्था आणि भारताचा जागतिक प्रभाव या क्षेत्रांमध्ये व्यापक बदलांचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींची ‘सप्तधारा’

पंतप्रधान मोदींची ‘सप्तधारा’

विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2047 पर्यंत ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यात 7 स्तंभ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. पंतप्रधानांनी उत्पादन क्षेत्र, कृषी, तंत्रज्ञान, ‘गती शक्ती’, संरक्षण, हरित ऊर्जा आणि ‘सॉफ्ट पॉवर’ या 7 क्षेत्रांची भारताचे भविष्य घडवणारे घटक म्हणून उध्दरूत केले.

पहिले सामर्थ्य – उत्पादन

पहिले सामर्थ्य - उत्पादन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाने उत्पादन क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. केवळ मोठ्या प्रमाणावरील उत्पादनावरच नव्हे, तर देशात लहान आणि सुटे भाग तयार करण्यावरही भर दिला पाहिजे. सुटे भागांपासून संपूर्ण यंत्रे आणि उत्पादनांपर्यंत विस्तार करण्याचे त्यांचे उद्देश असून त्यांनी पुढे म्हटले की, भारतीय कंपन्यांनी गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या जोरावर जागतिक बाजारात आपली ओळख निर्माण केली पाहिजे. त्यामुळे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होता कामा नये.

दुसरी शक्ती: शेतकरी अन् अन्न प्रक्रिया

दुसरी शक्ती: शेतकरी अन्  अन्न प्रक्रिया

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि अन्न उत्पादन व प्रक्रियेला ‘सप्तधारा’ची दुसरी शक्ती म्हटले. पंतप्रधान म्हणाले की भारताचे मसाले, फळे, फुले आणि इतर खाद्य उत्पादने जागतिक बाजारात उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच केवळ कृषी उत्पादने विकण्याऐवजी भारताने उच्च-मूल्याच्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.

तिसरी शक्ती: तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन

तिसरी शक्ती: तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन

पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच तिसरी ताकद म्हणून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज डेटा सेंटर्स, एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाचे युग आहे आणि नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान भारतासाठी आव्हाने आणि संधी दोन्ही घेऊन येत आहेत. त्यांनी पुढे म्हटले की, भारताने इनोव्हेशनचे जागतिक केंद्र बनले पाहिजे आणि देशातील डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगभरातील इतर देशांमध्ये प्रसारित करण्याच्या दिशेने काम करण्याच्या गरजेवरही भर देण्याचे आवाहन केले.

चौथी शक्ती – वेग आणि कनेक्टिव्हिटी

चौथी शक्ती – वेग आणि कनेक्टिव्हिटी

देशभरात अधिक जलद आणि उत्तम कनेक्टिव्हिटीवर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, शहरांना मेट्रोशी जोडणे, बंदरे आणि जमिनीवरील कनेक्टिव्हिटी सुधारणे, तसेच देशभरात वस्तू आणि लोकांच्या वाहतुकीला सुलभ करणे गरजेचे आहे.

पाचवी शक्ती – संरक्षण आणि सायबर सुरक्षा

पाचवी शक्ती – संरक्षण आणि सायबर सुरक्षा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील भारताचे आत्मनिर्भरत्व देशाने आणि जगानेही पाहिले आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी सायबर सुरक्षा आव्हान बनत असून अशा स्थितीत, पंतप्रधानांनी सायबर सुरक्षेला संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचेही सांगितले आणि या क्षेत्रात तरुणांच्या क्षमतेचा उपयोग करून घेता येईल.

सहावी शक्ती: ग्रीन आणि ब्लू अर्थव्यवस्था

सहावी शक्ती: ग्रीन आणि ब्लू अर्थव्यवस्था

पंतप्रधान मोदींनी ग्रीन हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा साठवण, हरित गतिशीलता आणि हरित उत्पादन यांच्या मोठ्या विस्ताराचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, भारतामध्ये पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्याची क्षमता असून भारताचा लांब किनारा देखील ब्लू इकॉनॉमीसाठी मोठी ताकद असून मत्स्यव्यवसाय, किनारी पर्यटन आणि सागरी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे.

सातवी शक्ती – भारताची सॉफ्ट पॉवर

सातवी शक्ती – भारताची सॉफ्ट पॉवर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, योगने जगभरातील लाखो लोकांना भारताशी जोडले. याव्यतिरिक्त आयुर्वेद, समग्र आरोग्यसेवा, आध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटन, हस्तकला, ​​भारतीय संस्कृती, चित्रपट, गेमिंग, व्हीएफएक्स, ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंट या क्षेत्रांमध्ये भारताकडे प्रचंड क्षमता आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा