Headlines

PFF Savings Rules ; गुंतवणुकीसाठी उत्तम, पण चुका टाळा; परताव्यात अडचणी नको तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा


अडीअडचणीला फक्त दोनच गोष्टी कामी येतात : एक म्हणजे आपली माणसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा! पण जेव्हा खिशात पैसा असतो तेव्हा आपल्याला कुणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने बचत करणे फार गरजेचे असते. आताच्या युगात बचतीवाचून पर्याय नाही. भविष्यात कितीही आर्थिक किंवा इतर अडचणी येउद्या, तुम्ही जर आधीपासून बचत केली असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात का होईना पण निश्चिंत असता कारण त्यावेळी तुम्हाला एक आधार असतो. अगदी रिटायरमेंटच्या जवळ पोहचलेल्या व्यक्तीलाही रिटायरमेंटची चाहूल लागताच बचत करण्याची जास्तच सवय लागते. कारण बचत हाच आयुष्याचा आधारआहे.

आताच्या काळात बचतीसाठी अनेक पर्याय तसेच स्कीम्स आहेत. बहुतेक लोकं बचतीसाठी PFF चा मार्ग निवडतात. PFF म्हणजे Public Provident Fund . हल्ली दीर्घकाळ बचतीसाठी लोकं PFF चा पर्याय निवडतात. पण एखादी गोष्ट करताना ती नियमांच्या चौकटीत आणि सर्व पत्थ्य-पद्धती पाळून केल्या तरच त्या गोष्टीला अर्थ असतो आणि भविष्यातील परिणाम हे फायद्याचे असतात. त्यामुळे जर तुम्हीही दीर्घकाळ बचतीसाठी PFF चा मार्ग निवडत असाल तर काही चुका आहेत त्या जर टाळल्या तर मिळणारा परतावा नक्कीच समाधानकारक असेल.

बचतीसाठी PFF ची निवड करण्याचा फायदा काय?

PFF ( पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ) ही एक भारत सरकारची बचत योजना आहे. दीर्घकालीन बचतीसाठी एक उत्तम पर्याय मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून बचत करण्याचे महत्वाचे फायदे म्हणजे व्याज वेळोवेळी मिळत राहतो, पण व्याजाचा दर बदलत राहतो. मुख्य म्हणजे मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर नसतो आणि मॅच्युरिटीही करमुक्त असते. जर तुम्हाला करसवलत हवी असेल तर PFF हा बचतीचा उत्तम पर्याय आहे. तर निवृत्तीनंतरच्या आयष्यासाठी आधार म्हणून बचत करण्याचा विचार असेल तर PFF हा उत्तम मार्ग ठरू शकतो.

या चुका टाळा!

‘अधिक गुंतवणूक म्हणजे अधिक व्याज’ या विचारावर जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही चुकीचे ठरू शकता. कारण योग्य प्रकारे बचत करायची असेल तर PFF मध्ये वर्षाला दीड लाखांहून जास्त पैसे जमा करू नये. कारण PFF च्या मार्गाने बचतकरणाऱ्या बहुतेकांचा हेतू करसवलत मिळवणे असतो. पण जर तुम्ही दीड लाखांहून अधिकची रक्कम जमा कराल तर लक्षात ठेवा की त्यावर करसवलत मिळत नाही. त्यामुळे वर्षाला दीड लाखांहून कमीची रक्कम जमा करणेच उत्तम.

महिन्याच्या 5 तारखेनंतर पैसे जमा करण्याची भूलचूक बिलकुल करू नये. कारण PFF मध्ये व्याजाचा हिशोब 5 तारखेपासून महिन्याच्या अखेरपर्यंतच्या सर्वात कमी रकमेवर होतो. त्यामुळे शक्यतो 5 तारखेआधीच पैसे जमा करावे.

आपले शरीर तेव्हाच जिवंत भासेल जेव्हा आपण श्वास घेऊ. तसेच आपल्या PFF अकाउंटला जिवंत ठेवण्यासाठी त्यात दरवर्षी किमान 500 रुपयांची जमापुंजी करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले PFF खाते निष्क्रिय होऊ शकते. वर्षातून एकदा किमान 500 रुपयांची बचत तुमचे PFF खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवू शकते.

Maharashtra Timesसुप्रीम कोर्टाचा निर्णय; कारमध्ये झालेला प्रत्येक मृत्यू ‘कार अपघात’ नाही, विमा क्लेम संबंधित महत्वाच्या अटीPFF बचतीचा पर्याय निवडताना एक गोष्ट लक्षात असावी. एका PFF खात्याची मुदत 15 वर्षांची असते. त्यांनतर आपल्या सोयीनुसार आपण आणखीन 5-5 वर्षांच्या कालावधी वाढवू शकतो.

PFF योजनेत करवसुली नाही आणि तसेच ही दीर्घकाळ बचत योजना आहे अशा अनेक फायद्यांमुळे कधीकधी एक व्यक्ती अनेक PFF खाते उघडतो आणि सगळ्यात मोठी चूक करतो. नियमांनुसार, एक व्यक्ती एकापेक्षा अनेक वैयक्तिक PFF खाते ठेवू शकत नाही, पुढे अनेक अडचणी येऊ शकतात.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत