Salman Khan : सलमान खाननं ‘अलायन्स’ या शोमध्ये त्याच्या तुरुंगातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्राइम व्हिडिओचा ‘अलायन्स’ हा रिॲलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोचा आगामी एपिसोड चर्चेत असून, त्यात सलमान खान दिसणार आहे. सलमान, सोहेल खानला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. सलमान खाननं त्याच्या तुरुंगातील कठीण काळाची आठवण सांगितली.
‘अलायन्स’ या रिॲलिटी शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये सलमान, सोहेल खानला प्रोत्साहन देताना दिसतोय आणि स्वतःचे तुरुंगातील अनुभव सांगून, त्यातून शिकण्याचा सल्ला देतो. तुरुंगातील प्रत्येक दिवस खूप कठीण होता, असं सलमाननं सांगितलं.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
सलमान खाननं सांगितला कठीण काळ
प्रोमोमध्ये, सलमान खान म्हणतोय की, ‘अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा मी तुरुंगात गेलो होतो, तेव्हा आमच्यासमोर खूप अडचणी होत्या. इतक्या लहान जागेत ५०, ६० किंवा ७० लोक होते. एकच बाथरूम, भारतीय पद्धतीचे कमोड, कधीकधी आतमध्ये सरडे यायचे आणि त्याहून वाईट म्हणजे, ते घाणीनं भरलेलं असायचं.’
याव्यतिरिक्त, सलमान खाननं ‘अलायन्स’मध्ये सोहेलच्या घटस्फोटावरही चर्चा केली. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, सलमान खान म्हणतो की, सोहेलनं दोष स्वतःवर घेतला असला तरी, एक कुटुंब सदस्य म्हणून त्यानं आपल्या लहान भावाला अडचणींचा सामना करताना पाहिलं आहे.
Kushal Badrike : ‘पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून मला घर चालवता आलं ही मोठी गोष्ट’, कुशल बद्रिकेचं वक्तव्य दरम्यान, सलमान खाननं यापूर्वी तुरुंग आणि बाथरूमच्या परिस्थितीबद्दल खुलासा केला होता. २००८ मध्ये ‘काउच विथ कोयल’वर बोलताना अभिनेता म्हणालेला की, ‘मला बाकी काहीच फरक पडत नव्हता. पण, फक्त बाथरूम घाणेरडं होतं आणि ती कचरापेटी…मी तीन-चार वेळा जेलमध्ये गेलोय. जर कोणी तुम्हाला जेलमध्ये पाठवू इच्छित असेल, तर तुम्ही शांतपणे जाता. पण जेव्हा तुम्हाला खात्री असते की, तुम्ही काहीही केलेलं नाही, तेव्हा तुम्ही ताठ मानेनं जेलमध्ये जाता.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा