Headlines

PF Auto Transfer Rules Change; नोकरी बदलली तरी थेट ट्रान्सफर होईल पीएफचे पैसे; EPFO च्या नियमात झाला मोठा बदल, कोणाला मिळणार फायदा?


PF Transfer Process: नोकरी बदलताना EPFO ने आधार-लिंक्ड असलेल्या UAN धारकांसाठी पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया ऑटोमॅटेड केली आहे. पण ईपीएफओच्या या नव्या प्रक्रियेचा फायदा सर्वांनाच मिळणार का? या नव्या प्रणालीचा कोणाला फायदा होऊ शकतो आणि तुम्ही काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी नोकरी बदलली असेल पण तुमचा बॅलन्स हस्तांतरित केला गेला नसेल, तर नवीन प्रणाली तुम्हाला लागू होईल का?

EPFO Automates PF Transfer Process Details
नोकरी बदलली तरी थेट ट्रान्सफर होईल पीएफचे पैसे; EPFO च्या नियमात झाला मोठा बदल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
EPFO New Rule: खासगी नोकरी करणारे महिने किंवा एक-दोन वर्षांत नोकरी बदलणे सामान्य आहे. पण अशा परिस्थितीत, पीएफबद्दल प्रश्न उपस्थित होतो. नोकरी बदलणाऱ्या अशाच कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, EPFO, ने एक मोठा बदल लागू केला आहे. यानुसार आता पीएफ हस्तांतरणची प्रक्रिया आणखी सुलभ झाली आहे.

पीएफ हस्तांरणाचा नवीन नियम

ईपीएफओच्या पीएफ ट्रान्सफरबद्दल नव्या बदलानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा UAN आधारशी जोडलेला आहे आणि ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांची पीएफ शिल्लक रक्कम आता विहित अटींची पूर्तता केल्यावर आपोआप हस्तांतरित केली जाईल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की, कर्मचाऱ्यांना आता पीएफ हस्तांतरणसाठी वेगळा अर्ज सादर करण्याची गरज राहणार नाही. तसेच, यामुळे जुन्या आणि नवीन नियोक्त्यांकडून मंजुरीच्या वेळखाऊ प्रक्रियेतूनही दिलासा मिळेल.

Maharashtra TimesIPO GMPs: देशातील सर्वात मोठ्या Mutual Fund कंपनीचा आयपीओ अखेर खुला झाला; 14000 रुपये गुंतवून 2548 रुपये कमावण्याची संधी!
याआधी पीएफ ट्रान्सफर कसं व्हायचं
यापूर्वी नोकरी बदलल्यावर कर्मचाऱ्याला जुन्या पीएफ खात्यातून नवीन खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागायचा. बहुतेक प्रकरणांमध्ये जुन्या आणि नवीन दोन्ही नियोक्त्यांची मंजुरी देखील आवश्यक होती. याशिवाय ईपीएफओची प्रक्रिया वेळखाऊ होती, ज्यामुळे अनेक कर्मचारी नोकरी बदलूनही जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम हस्तांतरित करू शकत नव्हते.

आता पीएफ ट्रान्सफर ऑटोमेटेड कसं होणार?

पण, आता नव्या प्रणालीनुसार तुमचा UAN आधारशी लिंक असेल आणि केवायसी पूर्ण झाली असेल तर, नोकरी बदलल्यानंतर पीएफ हस्तांतरण प्रक्रिया आपोआप सुरू होईल. मात्र, लक्षात घ्या की नवीन कंपनीत रुजू झाल्यावर लगेच तुमचा पीएफ हस्तांतरित होणार नाही.

ईपीएफओच्या नवीन प्रणालीनुसार, स्वयंचलित हस्तांतरण तेव्हाच सुरू होईल जेव्हा नवीन नियोक्ता तुमच्या खात्यात तुमचे पहिले EPF योगदान जमा करेल. म्हणजे पहिला PF हप्ता जमा झाल्यानंतर प्रणाली हस्तांतरण प्रक्रिया सुरू करेल.

Maharashtra TimesGold Silver Price Today: युद्धाच्या तणावात सराफा बाजारात उलटफेर; सोन्याच्या भावात मोठी पलटी, चांदीने फुंकला महागाईचा बिगुल

जुन्या कर्मचाऱ्यांनाही नव्या नियमाचा फायदा होईल का?

हाच सध्या नोकरदारांमधील सर्वात मोठा प्रश्न आहे, जो अजूनही अनुत्तरित आहे. काही कायदेतज्ज्ञांनुसार ज्यांनी पूर्वी नोकरी बदलली, पण आपला पीएफ हस्तांतरित केला नव्हता, त्यांनाही या नवीन प्रणालीचा फायदा होऊ शकतो. त्यांनी म्हटले की EPFO प्रणाली एकाच UAN शी लिंक्ड जुने सदस्य आयडी ओळखू शकते आणि त्यांना एकत्र करू शकते. मात्र, नवीन वैशिष्ट्य प्रत्येक बाबतीत आपोआप काम करेल की नाही, याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Maharashtra TimesGold ETFs Inflows: भारतीयांनी Gold Crash चा पुरेपूर घेतला फायदा; 3,443 कोटींची खरेदी केली; जागतिक प्रवासाच्या विरुद्ध गेम फिरवला

प्रत्येक बाबतीत स्वयंचलित हस्तांतरण शक्य नाही

सर्वच कर्मचाऱ्यांचे पीएफ हस्तांतरण आपोआप होणार नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. एखादा कर्मचारी आधीपासूनच नवीन कंपनीत काम करत असेल आणि नवीन खात्यात नियमित पीएफ जमा होत असेल, पण जुनी पीएफ शिल्लक वेगळी असेल तर, अशा प्रकरणांमध्ये स्वयंचलित हस्तांतरण शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्याला ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन हस्तांतरण प्रक्रिया स्वतः पूर्ण करावी लागू शकते त्यामुळे, स्वतः हस्तांतरण करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

स्वयंचलित हस्तांतरण न झाल्यास काय करायचे?

एखाद्या कारणास्तव तुमचे पीएफ हस्तांतरण आपोआप झाले नाही, तर EPFO पोर्टलवर लॉग-इन करून ट्रान्सफरची विनंती करा. यासाठी पहिला पर्याय म्हणजे की Online Services विभागात जाऊन Request for Transfer of Account पर्याय वापरा. दुसरा, Member Service History विभागात जाऊन तुमच्या मागील नोकरीच्या नोंदी बरोबर आहेत की नाही याची खात्री करा. हस्तांतरण प्रलंबित नसेल, तर तुम्ही तेथून फॉर्म 13 वापरून Service Transfer Claim देखील दाखल करू शकता.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा