FIFA World Cup 2026 Semi Final 1 : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि फ्रान्स यांच्यात आज, मंगळवारी मध्यरात्री उपांत्य लढत रंगणार असून, या प्रतिस्पर्ध्यांना हॅट्ट्रिक खुणावत आहे. स्पेनला फ्रान्सविरुद्धचा उपांत्य फेरीतील सलग तिसरा विजय खूणावत आहे, त्याच वेळी फ्रान्सला सलग तिसऱ्या वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

स्पेनचा संघ म्हणजे केवळ लामिन यमालच नाही हे फ्रान्स संघ जाणतो. स्पेनवरील दडपणही कमी नाही. फ्रान्सने गेल्या सातपैकी चार वर्ल्ड कप स्पर्धांत अंतिम फेरी गाठली आहे. या वेळीही फ्रान्सने उपांत्य फेरीत यश मिळवल्यास त्यांची तुलना १९७४ ते १९९० दरम्यानच्या पाचपैकी चार स्पर्धांत अंतिम फेरी गाठलेल्या पश्चिम जर्मनीच्या कामगिरीशी होईल.
Argentina vs Egypt Match : इजिप्तचा अर्जेंटिनाविरूद्धचा विजय रेफ्रींनी चोरला’; न्यूयॉर्कच्या महापौरांकडून बोचरी टीका, 11 मिनिटात झालेले 3 गोल
स्पेनच्या बचावफळीची स्पर्धेतील सर्वोत्तममध्ये गणना होत आहे. केप वर्देविरुद्धची लढत सोडल्यास स्पेनचा धडाका दिसला आहे. अर्थात, २०२४च्या युरो स्पर्धेच्या वेळी एम्बापे पूर्ण बहरात नव्हता; मात्र या वेळी वर्ल्ड कप पात्रतेपासून एम्बापे आणि देम्बेले यांनी प्रतिस्पर्थ्यांना हादरवले आहे. फ्रान्सचा वेगच स्पेनसमोर जास्त आव्हान असेल. ब्राझीलने १९९४ ते २००२च्या तिन्ही स्पर्धांत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर अशी कामगिरी करण्याची फ्रान्सला संधी आहे.
Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या
प्रतिस्पर्ध्यांमधील चुरस
- खेळानुसार खेळाडूंचे स्वरुप बदलण्याची दोन्ही संघांची हातोटी. त्यातही स्पेनची मदार भक्कम मधल्या फळीवर
- पाच बचावपटू आणि तीन आक्रमकांनी बचाव करणारे स्पेन प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रानजीक सहा आक्रमक, एक मध्यरक्षक आणि तीन बचावपटूंसह खेळतात.
- आपल्या खेळाच्या शैलीत वेगाने बदल करण्याची फ्रान्सची हातोटी. प्रतिआक्रमण सुरू झाल्यावर दोन बचावपटूंच्या मदतीला एक मध्यरक्षक राहतो. मधल्या फळीतील सहा खेळाडू एकमेकांच्या साथीत वाटचाल करतात आणि गोलक्षेत्राच्या नजीक असलेल्या एम्बापेला अधिकाधिक संधी असताना चेंडू पास करतात.
- बचाव असतानाही एम्बापे मध्यरेषेच्या नजीक प्रामुख्याने असतो; मात्र याच वेळी प्रतिस्पर्ध्याच्या चाली मधल्या भागात रोखण्याचा फ्रान्सचा जास्त प्रयत्न
- बचाव करताना प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमकांवर आपले अधिकाधिक खेळाडू कसे राहतील, याकडे स्पेनचे लक्ष. प्रसंगी आक्रमकांस मागे पास देण्याशिवाय पर्याय राहणार नाही
लक्षवेधक…
- फ्रान्सचे या स्पर्धेतील १६पैकी ११ गोल उत्तरार्धात
- फ्रान्सचे या स्पर्धेत सरासरी ऑन टार्गेट प्रयत्न ७.८. सर्व संघांत सर्वोत्तम
- स्पेनच्या गेल्या १६पैकी चारच सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांचे गोल
- लामिन यमालचे फ्रान्सविरुद्ध दोन सामन्यांत तीन गोल
- स्पेनने गेल्या ३६ सामन्यांत ९० मिनिटांत हार पत्करलेली नाही. त्यात २६ विजय आणि १० बरोबरी
- स्पेनने प्रतिस्पर्ध्यांतील गेल्या दहापैकी सात लढती जिंकल्या आहेत.
- स्पर्धेत स्पेनविरुद्ध एक, तर फ्रान्सविरुद्ध दोन गोल; मात्र याच वेळी फ्रान्सचे १६ गोल, तर स्पेनचे ११.

