WPI Inflation Rate June 2026: पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. जून महिन्यातील घाऊक महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढून 9.87 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मुख्यतः खाद्यपदार्थांच्या किमतींमधील वाढ आणि उत्पादन खर्चावरील दबाव ही महागाई दर वाढीची मुख्य कारणे होती. मात्र इंधन आणि विजेच्या महागाईत काहीसा दिलासा मिळाला.

महागाई हाताबाहेर गेली
DPIIT म्हणजे सरकारी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या प्रसिद्ध आकडेवारीनुसार, या दरवाढीचे सर्वात मोठे कारण अन्नधान्य महागाई आणि प्राथमिक वस्तू, म्हणजेच कच्ची कृषी उत्पादन आणि इतर प्राथमिक वस्तूंच्या किमतीतील वाढ असल्याचे मानले जाते. इंधन आणि वीज, उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे महागाईने उंच उडी घेतली.
Property Rights: मुलीच्या वारसांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का? मुलीचा पती, मुलं तिच्या आई-वडिलांचे वंशज होत नाहीत का? नियम वाचा
मध्यपूर्वेतील तणाव नव्याने वाढला ज्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने कळस गाठला. फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याचं नाव घेत नाही परिणामी, महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. याआधी आदल्या दिवशी किरकोळ महागाईचा दर जाहीर केला गेला जो सलग सातव्या महिन्यात 4.38 टक्क्यांवर पोहोचला.
महागाई वाढण्याचे मुख्य कारण काय
इंधन महागाईत घट झाली असली तरीही, वाढत्या अन्नधान्याच्या किमती आणि उत्पादन खर्चाच्या दबावामुळे महागाईचा भडका उडाला. WPI वर आधारित महागाई सलग दुसऱ्या महिन्यात दुहेरी अंकांजवळ राहिली. अन्नधान्याच्या किमती, पेट्रोलियम उत्पादने, मूलभूत धातू आणि रसायने यांच्या किमतीतील वाढ या महागाई वाढीचे मुख्य घटक ठरले.
PF New Rule: नोकरी बदलली तरी थेट ट्रान्सफर होईल पीएफचे पैसे; EPFO च्या नियमात झाला मोठा बदल, कोणाला मिळणार फायदा?
पश्चिम आशियाई संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील प्रभावी नाकेबंदीमुळे घाऊक महागाईतील ही तीव्र वाढ झाली. अशा स्थितीत, अमेरिका-इराणने होर्मुझची वाट रोखून धरली असून होर्मुझ सामुद्रधुनीतून भारत आपल्या कच्च्या तेलाचा बहुतांश भाग आयात करतो, ज्याचा परिणाम अन्न-धान्याच्या किमतींवरही झाला.
दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्या
- दररोजच्या वापराच्या (प्राथमिक वस्तू) वस्तूंची महागाई 4.99% वरून 7.00% पर्यंत वाढली.
- अन्नधान्याची महागाई 4.49% वरून 6.14% पर्यंत वाढली.
- इंधन आणि विजेची घाऊक महागाई 30.33% वरून 27.41% पर्यंत कमी झाली.
- उत्पादित वस्तूंची घाऊक महागाई 7.48% वर स्थिर राहिली.
WPI महागाईचा सर्वसामान्यांवरील परिणाम
दीर्घकाळ टिकणाऱ्या उच्च घाऊक चलनवाढीचा बहुतेक उत्पादक क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे WPI महागाई दर दीर्घकाळ उच्च राहिल्या, तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतील परिणामी, दररोजच्या वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागेल. सरकार केवळ टॅक्सच्या माध्यमातून घाऊक किंमत निर्देशांक नियंत्रित करू शकते.
उदाहरणार्थ, क्रूडच्या तीव्र दर वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले, पण सरकार केवळ एका मर्यादेपर्यंतच कर कपात करू शकते. मेटल, रसायने, प्लॅस्टिक आणि रबर यांसारख्या कारखान्याशी संबंधित वस्तूंना WPI मध्ये अधिक महत्त्व असते.

