Headlines

Pankaja Munde : काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पंकजा मुंडेंचा भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु?



राजकारणात मी पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा मी सांगितलं होतं जर राजकारण माझ्या मनासारखं किंवा विचारांशी समरस वाटलं नाही, तर जसा समृद्धी महामार्गाला बाहेर पडण्यासाठी एक्झिट असतो, तसाच माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केला. त्यानंतर मला निवृत्त व्हावंसं वाटतं असंही पंकजा मुंडे एका कार्यक्रमात म्हणाल्या. मात्र, पुढे त्यांनी समोर जमलेला अलोट जनसमुदाय आणि जनतेचा उत्साह पाहिला की पुन्हा नव्याने उभारी मिळते, असेही स्पष्ट केलं पण समृद्धी महामार्गाच्या एक्झिटच्या उपमेनं पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानानं आता राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण आलंय. ज्या पंकजा मुंढेंनी मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत केला, गोपीनाथ मुंडेंचा वारसा समर्थपणे चालवला, त्यांनाच आज ‘रिटायरमेंट’चा विचार का करतायत? पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर लगेचच विरोधकांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर पंकजा मुंडेंना थेट पक्षांतराची आणि काँग्रेसमध्ये येण्याची ऑफरच देऊन टाकली. पंकजा मुंढेंनी ओबीसींचं नेतृत्व करावं, भाजपमधून बाहेर पडावं. महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा आम्ही तुम्हाला साथ देऊ असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं. या सर्व घडामोडींनंतर पुन्हा एकदा तोच जुना प्रश्न ऐरणीवर आला आहे—पंकजा मुंडे खरोखरच नाराज आहेत का? भाजपमध्ये त्यांना सातत्याने डावललं जातंय का? आणि भाजपसाठी पंकजा मुंडे नेमक्या किती महत्त्वाच्या आहेत? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊय़ा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत