Headlines

team india fielding coach t dilip emotional farewell post after bcci exit; दोन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् आशिया कप जिंकून दिले, टीम इंडियाच्या कोचचा मध्येच निरोप! भावुक इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत


२०२४ अन् २०२६ चे टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार राहिलेले क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचा कार्यकाळ अखेर संपला. भारतीय संघाला निरोप देताना त्यांनी कोणाचे आभार मानले?

team india fielding coach t dilip emotional post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघासोबतचा एक मोठा आणि यशस्वी प्रवास अखेर पूर्ण झाला आहे. भारताचे फील्डिंग कोच टी. दिलीप यांचा भारतीय संघासोबतचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपला असून त्यांनी टीम इंडियाचा निरोप घेतला आहे. संघातून बाहेर पडल्यानंतर टी. दिलीप अत्यंत भावुक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर एक मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. ५ वर्षांचा हा प्रवास शब्दांत मांडणे कठीण असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये झाला होता प्रवेश; सुभादीप घोष घेणार जागा

टी. दिलीप नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० (T20I) मालिकेनंतर त्यांचा करार न वाढवल्याने ते भारतीय संघापासून वेगळे झाले आहेत. त्यांच्या जागी आता सुभादीप घोष यांची भारताचे नवीन फील्डिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी घोष भारतीय संघासोबत श्रीलंकेला रवाना होतील.

टी. दिलीप यांची भावुक इन्स्टाग्राम पोस्ट

सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून भावना व्यक्त करताना टी. दिलीप यांनी लिहिले, “पाच वर्षे… इतका महत्त्वाचा प्रवास शब्दांत मांडणे सोपे नाही. जेव्हा मी पहिल्यांदा या सेटअपमध्ये आलो होतो, तेव्हा माझा एकच उद्देश होता – दररोज माझे १००% देणे. क्रिकेट या खेळावर माझे मनापासून प्रेम आहे आणि फील्डिंग हाच या खेळासाठी योगदान देण्याचा माझा मार्ग होता. या अद्भुत संघाच्या प्रवासाचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”

Maharashtra TimesGlasgow CWG 2026 : 6 खेळ रद्द, तरीही कॉमनवेल्थमध्ये बाप ठरत 13 गोल्ड अन् 39 पदकांसह भारताची कितव्या स्थानावर उडी?

टी-२० वर्ल्ड कप ते चॅम्पियन्स ट्रॉफी; सुवर्ण क्षणांना उजाळा

भारतीय ड्रेसिंग रूममधील आठवणींना उजाळा देताना टी. दिलीप यांनी आपल्या कार्यकाळातील मोठ्या यशांचा उल्लेख केला. यामध्ये खालील प्रमुख विजयांचा समावेश आहे.

  • आयसीसी टी-२० वर्ल्ड कप विजय (२०२४ आणि २०२६)
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजय (२०२५)
  • आशिया कप विजय (२०२३ आणि २०२५)
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) आणि आयसीसी पुरुष वन-डे वर्ल्ड कप (२०२३) मधील उपविजेतेपद

Maharashtra TimesWho Is Akhilesh Reddy : भारतीय, SRHचा बॉलर, मग USA टीममध्ये कसा? फिक्सिंगमुळे बॅन केलेला अखिलेश रेड्डी आहे तरी कोण?

राहुल द्रविड, गौतम गंभीर आणि सर्व कप्तानांचे मानले आभार

आपल्या पोस्टमध्ये टी. दिलीप यांनी पूर्व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय संघाच्या वेगवेगळ्या कर्णधारांचे विशेष आभार मानले. त्यांनी लिहिले, “माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक आभार! राहुल द्रविड आणि गौतम गंभीर, तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद.

तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर – तुमच्या सर्वांसोबत काम करणे आणि तुमच्या नेतृत्वात योगदान देणे हा माझा सन्मान होता. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे मनापासून आभार. आपण एकत्र निर्माण केलेल्या या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.”

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा