Headlines

Non vegetarians will not get homes in mumbai mns gives aggressive warning over bhavesh kaware video; मी नॉन व्हेजबाबत तशी जाहिरात टाकली कारण मालक वारकरी; तरुणाचा खुलासा, पण मनसेचा आक्रमक इशारा


मुंबई: मुंबई शहर आणि परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून शाकाहारी आणि मांसाहारी वाद उफाळून येत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच या वादात एका नव्या व्हिडिओने भर घातली आहे. मुंबई शहरातील ताडदेव परिसरात विक्रीस असणाऱ्या एका फ्लॅटची जाहिरात करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर तरुण सुरुवातीला या फ्लॅटची लवकर विक्री व्हावी, यासाठी त्याचे फायदे आणि वैशिष्ट्ये सांगताना दिसत आहे. मात्र शेवटी या तरुणाने फ्लॅट विक्रीसाठी मालकाची एक अट असल्याचं सांगितलं आहे. तुम्ही नॉन व्हेज खात असाल तर इथं तुम्हाला घर मिळणार नाही, असं या तरुणाने म्हटल्याने वाद निर्माण झाला असून विविध राजकीय पक्षांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भावेश कावरे या इस्टेट एजंट तरुणाने हा व्हिडिओ तयार केला होता. मांसाहार चालणार नसल्याच्या अटीवरून वाद निर्माण झाल्यानंतर कावरे याने पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हा फ्लॅट एका वारकऱ्याचा असल्याने त्यांनी तशी अट टाकल्याचा दावा भावेश कावरे याने स्पष्टीकरण देताना केला आहे. “जे घर विक्रीला होते, त्याचा मालक मराठीच होता. मात्र ते वारकरी संप्रदायातील असल्याने शाकाहारी व्यक्तीला घर विकावे, अशी त्यांची श्रद्धा होती. हे घर एका मराठी माणसानेच विकत घेतले आहे. मी देखील मराठी असून माझे चिकनचे दुकान आहे. व्हिडिओमध्ये मी कुठेही मराठी असा उल्लेख केला नव्हता. पण काही राजकीय लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत,” असा आरोप भावेश कावरे याने केला आहे.

मनसेचा इशारा

मुंबईतील तरुणाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसेने आक्रमक इशारा दिला आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने या व्यक्तीचा समाचार घेतला जाईल,” असं मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “मी आताच त्या मुलाची रील पाहिली. त्याचं नाव कावरा की काय आहे. आम्ही त्याला बावरा करू,” असा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला आहे.

दरम्यान, मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर देऊ नये, असा कोणताही कायदा महाराष्ट्र सरकार किंवा मुंबई महापालिकेचा नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई महापौर संजय घाडी यांनी दिली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत