प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनआणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर केली जातात. शौर्य पदके, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक सेवा अशा श्रेणींमध्ये त्यांना गौरवले जाते. पदक जाहीर झाल्यानंतर साधारणतः वर्षभरात राज्यपालांच्या हस्ते पदके आणि प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाते.
Ghatkopar Landslide : वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंतपदक लावण्याचा मानसन्मान वेगळाच असतो’, अशी प्रतिक्रिया हे पोलिस व्यक्त करीत आहेत. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर केली जातात. शौर्य पदके, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक सेवा अशा श्रेणींमध्ये त्यांना गौरवले जाते. पदक जाहीर झाल्यानंतर साधारणतः वर्षभरात राज्यपालांच्या हस्ते पोलिसांना त्यांचे नाव कोरलेली पदके आणि प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाते. राजभवनात होणारा हा दिमाखदार सोहळा पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील अनमोल क्षणांपैकी एक मानला जातो. राज्यातील ३६४ पोलिस आणि त्यांचे कुटुंबीय मागील चार वर्षांपासून या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट २०२३पासून जानेवारी २०२६पर्यंत जाहीर झालेल्या पदकांचे अद्याप वितरणच झाले नाही.
‘पदके कधी मिळणार हे माहीत नाही. विलंब का होत आहे, याची कारणे कोण देत नाही. यावर्षी तरी राजभवनात कार्यक्रम होईल आणि पदक मिळेल, असे वाटत असतानाच निवृत्ती आली. माझ्याप्रमाणे अनेकजण वाट पाहून निवृत्त झाले. सेवेत असतानाच हे पदक वर्दीवर लागले असते तर छाती अभिमानाने फुलली अस्ती’, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
पदकावर नाव कोरायला विलंब लागतो, करोनामुळे वेळापत्रक कोलमडले, राज्यपालांकडून वेळ मिळत नाही, अशी वेगवेगळी कारणे ऐकायला मिळत असल्याचे एका हेड कॉन्स्टेबलने सांगितले. तर, ‘जवळचे अनेकजण कुतूहलापोटी राष्ट्रपती पदक दाखवायला सांगतात, पण ते अजून मिळाले नाही सांगताना आम्हालाच ओशाळल्यासारखे होते. कायदा-सुव्यस्था असो वा अन्य काही घटना, प्रत्येकवेळी पोलिसच पुढे असतात. अशावेळी हा विलंब म्हणजे आमची अवहेलना आणि राष्ट्रपतींचा अपमान आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया एका पोलिसाने दिली.
Vile Parle Fire : मरण डोळ्यासमोर तरी कर्तव्य विसरली नाही, फ्लॅटला आग, घरकाम करणाऱ्या अंकिताची चिमुकल्या अबीरसाठी धाव, दोघांचाही वेदनादायी अंतपदकविजेत्या दोन पोलिसांचा मृत्यू
पदकविजेत्या ३६४ पोलिसांपैकी दोघांचे निधन झाल्याचे सांगण्यात येते. जानेवारी २०२५मध्ये जाहीर झालेल्या नावांमध्ये यापैकी एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश होता.
पदके जाहीर झालेले पोलिस अधिकारी व अंमलदार
ऑगस्ट २०२३ : ७६
जानेवारी २०२४ : ६२
ऑगस्ट २०२४ : ५९
जानेवारी २०२५ : ४३
ऑगस्ट २०२५ : ४९
जानेवारी २०२६ : ७५
पदनिहाय तपशील
वर्ष –शौर्य –उल्लेखनीय –गुणवत्तापूर्वक
ऑगस्ट २३— ३३ —०३ —४०
जानेवारी २४— १८ —०४ —४०
ऑगस्ट २४— १७ —०३ —३९
जानेवारी २५— ०० —०४ —३९
ऑगस्ट २५— ०७ —०३ —३९
जानेवारी २६— ३१ —०४ —४०
