Headlines

Nitish Bhardwaj Reaction On Ranbir Kapoor Ramayana Trailer ;Nitish Bhardwaj On Ramayana : टीव्हीवरील श्रीकृष्ण रणबीर कपूरचा श्रीरामपाहून भारावला! 100 % ऑस्कर मिळणार, पण ॲनिमलसारखे सिनेमे न करण्याचा सल्ला


Nitish Bhardwaj Advise To Ranbir Kapoor : महाभारत या मालिकेत श्रीकृष्णाचा रोल साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी नुकतीच सोशल मीडिया द्वारे रणबीर कपूरचा आगामी सिनेमा रामायणम् वर प्रतिक्रिया दिली.

nitish bhardwaj
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रणबीर कपूर, साई पल्लवीची मुख्य भूमिका असलेला ‘रामायणम्’ हा चित्रपट 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर पहाटे ब्रह्म मुहूर्तावर प्रदर्शित झाला. त्यावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. टीव्हीवर भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते नितीश भारद्वाज यांनी सुद्धा या ट्रेलरचे कौतुक केले आणि हा चित्रपट ऑस्कर जिंकेल, अशी शक्यता वर्तवली. तसेच, त्यांनी अभिनेता रणबीर कपूरला एक सल्लाही दिला.

‘रामायणम्’ चित्रपटाचे विविध पैलूंसाठी कौतुक

नितीश भारद्वाज यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिले, “‘रामायण’च्या ट्रेलरबद्दल माझे मत असे आहे की: हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट’ श्रेणीत 100 टक्के ऑस्कर जिंकेल. खूप खूप अभिनंदन.”

Maharashtra TimesSarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद
त्यांनी पुढे म्हटले, “सत्यजित रे आणि शेखर कपूर यांच्यानंतर, नितेश तिवारी ही जागतिक चित्रपटसृष्टीला भारताने दिलेली पुढची मोठी देणगी आहे. या चित्रपटाला प्रॉडक्शन डिझाइन आणि सिनेमॅटोग्राफीसाठी अनेक पुरस्कार मिळतील. व्हीएफएक्स आणि एआय चा वापर करून एक भव्य चित्रपट साकारण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसोबत काम केल्याबद्दल महान संगीतकार हॅन्स झिमर यांचे आभार. रणबीर आणि रणवीर आता एकत्र येऊन पुढील दोन ‘अनस्टॉपेबल पॉवरहाउसेस’ बनले आहेत. यश, जागतिक चित्रपटसृष्टीत तुझे स्वागत आहे.”

रणबीर कपूरसाठी महत्त्वाचा सल्ला

नितीश भारद्वाज यांनी आपल्या पोस्टमध्ये रणबीरसाठी एक खास संदेश दिला आहे: “आरके, एक अभिनेता म्हणून मी नेहमीच तुझे कौतुक केले आहे; पण आता भारताचा वारसा, मूल्ये, संस्कृती आणि परंपरा जपण्याची तुझी सामाजिक जबाबदारी सुरू होत आहे. त्यामुळे, ‘ॲनिमल’सारखे चित्रपट यापुढे करू नकोस मग त्यासाठी तुला कितीही मोठी रक्कम का दिली जात असेना…. कृपया, तुझी प्रतिमा आणि आवाज यापुढे मलीन होणार नाही याची काळजी घे. भारतात अशा अनेक कथा आहेत ज्या तुझ्या अभिनय कौशल्याला वाव देऊ शकतात. मला फक्त एवढीच आशा आहे की, भारतीय प्रेक्षक साई पल्लवीचा ‘सीता’ म्हणून स्वीकार करतील आणि चित्रपटात मृदंग व मंजीऱ्यांच्या नादासोबतच मला तुलसीदासांच्या ‘चौपाइयां’चेही आवाज ऐकायला मिळेल. हा त्या महाकाव्याचा आवाज आहे जो प्रत्येक भारतीयाच्या आत्म्यात वसलेला आहे. नितेश तिवारी यांनी या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कष्टांचा आदर म्हणून, मला ‘रामायण’ किमान पाच वेळा पाहायला आवडेल.”

रामायणम् सिनेमातली स्टारकास्ट

रणबीर कपूरव्यतिरिक्त, ‘रामायणम्’ या चित्रपटात अरुण गोविल हे राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहे. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसेल. विवेक ओबेराय, रकुल प्रीत, रवी दुबे, यश आणि फैसल खान यांसारखे उत्कृष्ट कलाकार झळकणार आहेत. यात यश रावणाची भूमिका साकारत आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत असेल पण त्याचा लुक अद्याप दाखवला गेला नाहीये, चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यातील व्हीएफएक्सची प्रशंसा केली आहे.