Headlines

सांगली-कोल्हापूर पुराच्या त्रासातून मुक्त होणार- मुख्यमंत्री:40 टीएमसी पाणी कॅनॉलद्वारे वळवणार, कोल्हापुरात विविध विकासकामांचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण




सांगली आणि कोल्हापुरात महापुरामुळे जनतेचा आक्रोश होतो. नागरिकांना पुराच्या त्रासातून वाचवण्यासाठी ३२०० कोटींचा “महाराष्ट्र प्रतिसाद क्षम विकास प्रकल्प’ राबवण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगलीची महापुराच्या त्रासातून सुटका होईल. नियंत्रण प्रकल्पातून दुष्काळी भागाला कॅनॉलद्वारे सुमारे ४० टीएमसी पाणी वळवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले या वेळी ते बोलत होते. कोल्हापूर व सांगलीतील पावसाचा सर्व्हे करून मॉडेल तयार केले असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. काही कमी पडू देणार नाही या कोल्हापूरवर होतं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या-तांबड्यावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे, अजितदादांचं तर विशेष प्रेम या कोल्हापूरवर होतं. यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कधी कमी पडू दिलं नाही, यापुढेही कोल्हापूरला कमी पडू देणार नाही, पण यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता-जाता एक बॉल टाकून देतो – हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे, असेही त्यांनी सांगितले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत