Headlines

Nepal Floods 37 Mumbai Tourists Return Home After Seeing Family then Emotional Whole Story Told about Incident; ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’; नेपाळमधून 37 जणांचा गृप मुंबईत परतला, पोहोचताच कुटुंबीयांना पाहून ढसाढसा रडले, भयावह आपबिती सांगितली


Nepal Flood Emotional Story of Tourists Returning : तिमुरे येथे झालेल्या विध्वंसानंतर कुणी अडकले आहे का, याचा शनिवारीही शोध घेतला जात होता. मात्र, महाराष्ट्रातील बेपत्ता पर्यटकांबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त कळले नसल्याचे सांगण्यात आले. या पुरामध्ये काही नागरिक डोंगरांवर चढले का, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र विध्वंसानंतरची सध्याची तेथील स्थिती भयावह असल्याचेही बोलले जात आहे.

Nepal Flood Emotional Story of Tourists Returning
नेपाळहून मुंबईचे पर्यटक परतले(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘गेल्या आठवड्यात मुंबईवरून काठमांडूला पोहोचलो. कैलास-मानसरोवरला पोहोचल्यावर वातावरणाचा थोडा त्रास झाला. त्यामुळे आम्हाला परिक्रमा पूर्ण करता आली नाही. आम्ही दर्शन घेऊन परत निघालो. वैद्यकीयदृष्ट्या त्रास झाल्याने आम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी पुराचा कहर झाला त्या केंद्राऐवजी रुग्णालयात गेलो आणि वाचलो… ही देवाचीच कृपा…’ अशा शब्दांत भोसले दाम्पत्याने भावना व्यक्त केली.

पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला

काठमांडूहून मुंबईत परतलेल्या दिनेश भोसले आणि त्यांच्या पत्नी तसेच स्मिता पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नेपाळमधील दुर्घटनेनंतर भोसले यांच्यासह चार जण आणि आणखी ३७ जणांचा गट शनिवारी मुंबईमध्ये परतला. ‘इमिग्रेशनसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली नसती तर आम्ही त्याच केंद्रावर असतो आणि कदाचित वाहून गेलो असतो. आमच्या समोरच एक मोठा समूह नेपाळमध्ये परतण्यासाठी इमिग्रेशन केंद्रावर आला होता आणि त्यांचा आता मागमूसरही लागत नसल्याचे या यात्रेकरूंनी सांगितले. हा खूप मोठा धक्का आहे. आपण वाचल्याचे समाधान आणि इतरांच्या अस्तित्वाचा अंदाज येत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची झालेली स्थिती, अशा दोन्ही भावना एकाचवेळी अनुभवत आहोत’, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesAkansha Patel : जिजूला बर्थडे मेसेज, थँक्यूचा रिप्लाय आला, दहा मिनिटात महाप्रलय; आप्तांच्या ओढीने बहिणीला अन्न गोड लागेना, अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी दाम्पत्य बेपत्ता

यात्रेकरूंच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू

अलिबागच्या चौल येथील जय गिरनारी शिवदत्त ट्रस्टच्या वतीने ३७ भक्तांसाठी नेपाळ, तिबेट येथे धार्मिक यात्रेचे आयोजन केले होते. १६ ते २९ ऑगस्ट असा त्यांचा प्रवासाचा कालावधी होता. २६ तारखेला हे सर्वजण सागा या ठिकाणी होते आणि त्याचदिवशी तिमुरे येथे पुराची घटना घडली. त्यामुळे हे यात्रेकरू वाचले. त्यानंतर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार तसेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. शुक्रवारी कोदारी सीमेवर चेकपोस्ट सुरू झाल्यानंतर शनिवारी इंडिगोच्या विमानाने त्यांना मुंबईत पोहोचवण्यात आले. मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर या यात्रेकरूंच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. पुराचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर येत असताना आपले नातेवाईक सुखरूप घरी आल्याचा आनंद हा त्यांच्या नातेवाईकांनाही शब्दांमध्ये सांगता येत नव्हता.

…त्यामुळे जीव वाचला

‘काठमांडूला वेळेत पोहोचलो असतो, तर २६ तारखेला आम्ही तिमुरे गावात परतीच्या वाटेवर असतो आणि मग आम्हीही वाहून गेलो असतो… पण तसे झाले नाही’, अशा शब्दांत बोरिवली येथील पूनम आणि शमा साठे यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यात्रा १५ ते २८ ऑगस्ट होती. मात्र, व्हिसा मिळायला एक दिवस उशीर झाल्याने पुढचा प्रवास एका दिवसाने लांबला आणि त्यामुळे जीव वाचला असे त्यांच्यासह इतर यात्रेकरूंनीही सांगितले. हुबळीच्या वर्षा करी यांनीही तिमुरे येथे २६ तारखेला पुढच्या प्रवासासाठी उपस्थित नव्हतो, याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. ज्यांचे नातेवाईक त्यावेळी तिमुरे येथील इमिग्रेशन केंद्रावर होते, त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करत त्यांच्याबद्दल लवकरच माहिती मिळू दे, अशी प्रार्थनाही केली.

Maharashtra TimesNepal Flood : प्रलयाची वॉर्निंग मिळताच चेक आऊट केलं, हॉटेल सुस्थितीत पण चौकोनी कुटुंबाशी संपर्क होईना, चिंताग्रस्त नातेवाईकांची नेपाळला धाव

प्रवास कसोटीचा

यात्रेसाठी जाताना चीन सरकारने व्हिसा, परमिट नाकारल्याने आमच्या नियोजित तारखांमध्ये थोडा बदल झाला आणि ते चांगल्यासाठीच झाले. २१ ऑगस्टला कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली. तोपर्यंत सगळे वातावरण छान होते. मात्र नंतर पावसाला, हिमवर्षावाला सुरुवात झाली. आमच्यासोबत अनेक ज्येष्ठ होते. २०जण मुंबई, ठाण्याचे तर काही पुणे, कराडचे होते. २४ ते २६ ऑगस्टदरम्यान आमची परिक्रमा झाली. यामध्येही पावसामुळे अडथळे आले. मात्र, २६ ऑगस्टला परिक्रमा पूर्ण करून सागाला परतेपर्यंत आम्हाला तिमुरेला काय झाले याचा अंदाजही नव्हता. रस्ते वाहून गेल्याने आम्ही दोन दिवस सागा येथे थांबलो. त्यावेळी राज्य सरकार तसेच नेपाळ सरकारचे अधिकारी संपर्कात होते. शुक्रवारी सकाळी सागाहून निघून १६ तासांचा प्रवास करून काठमांडूला पोहोचलो आणि मग २९ ऑगस्टला नियोजित विमान पकडून मायदेशी परतलो. हा प्रवास परीक्षा घेणारा होता, मात्र देवावर श्रद्धा ठेवून सुखरूप आलो, असे शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या कैलास मानसरोवर यात्रा आयोजक प्रमोद केणे यांनी सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा