Headlines

Nepal Flood: नेपाळमध्ये महाप्रलय! 150 जणांचा करुण अंत, 133 भारतीयांसह 750हून अधिक बेपत्ता


Nepal Flood Tragedy: पुराचा प्रचंड लोंढा आल्यानंतर नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यातील एक पूल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त झाला.

Anderson Phillip Catch - 2026-08-27T091952
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, काठमांडू: तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे अचानक आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला. या जलप्रलयात सुमारे १५० जणांचा मृत्यू झाला, तर ७५०हून अधिक जण बेपत्ता झाले. यामध्ये १३३ भारतीयांचा समावेश आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. यात अनेक गावे, महत्त्वाचे पूल वाहून गेले, तर किमान डझनभर जलविद्युत प्रकल्पांसह रस्ते आणि वीजपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

सगळ्यात आधी तिबेट भागात स्थानिक प्रमाण वेळेनुसार ८.३७ वाजता भूकंप झाला. यानंतर अवघ्या तीनच मिनिटांनी पूर आला. यावरून भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदीचे कडे कोसळल्याने हा जलप्रलय आला असावा, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी संसदेला सांगितले. तिबेटच्या दिशेने आलेल्या या पुरामुळे भोटे कोशी नदी दुथडी भरून वाहू लागली. तिबेटच्या सीमेला लागून असलेले रासुवा आणि धाडिंग जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला. त्यानंतर हा पूर धाडिंग, नुवाकोट आणि चितवन जिल्ह्यांपर्यंत पसरला, ज्यामुळे किमान चार पक्के पूल आणि काही तात्पुरत्या पुलांचे नुकसान झाले झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संपर्क साधून पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला; तसेच मदतीसाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही दिली.

Maharashtra TimesNepal Flood : नेपाळमध्ये महापूर! हजारहून अधिक लोक गेले वाहून, घर पत्त्यांसारखे कोसळलेनेपाळमध्ये बेपत्ता असलेले भारतीय कोणत्या राज्यातील आहेत, अशी विशिष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांना इतर वेळीही दिवसभरात संपर्क साधणे कठीण होते, आता नेपाळच्या तिमुरे गावापासून २० ते २२ किलोमीटवरील सेब्रुबेसी या गावापर्यंत हानी झाली आहे. तिथे संपर्काची साधने नाहीत.

महाराष्ट्रातील चार जण सुखरूप
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये सुमारे १३३ भारतीय आणि अन्य काही अनिवासी भारतीय अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याची धडपड सुरू झाली. महाराष्ट्रातील दोन मुंबईतील आणि दोन पुण्यातील पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही मुंबईकर पर्यटकांशी रात्री उशिराही संपर्क न झाल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

Maharashtra Times11 जलविद्युत केंद्रं, 40 रस्ते, 19 पूल, 10 पेक्षा अधिक बँका उद्ध्वस्त; पुरामुळे नेपाळवर संकटमोदी यांची मदतीची ग्वाही नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संपर्क साधूने झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला; तसेच भारत सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. ‘पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा केली. नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला,’ असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा