Headlines

Nashik Chicken Businessman Threatened with False Case Gutkha Smuggling Police Officer Arrested while Taking Bribe; गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, कोंबडी व्यावसायिकाने विनवण्या केल्या, पोलीस अधिकारी ऐकेना; रंगेहाथ पकडलं


Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे.

Nashik Crime
नाशिक पोलीस अधिकारी मनोज गायकवाड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गावी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका व्यावसायिकाला गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याचकडून हजारो रुपयांची लाच घेणाऱ्या पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. शहर परिसरात म्हसरूळ पोलीस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘तू गुटख्याची तस्करी करतो’

तक्रारदार हा महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या जोडणाऱ्या सीमालगत नाशिक जिल्ह्यात असलेल्या पेठ तालुक्यातून कोंबड्यांची गुजरात राज्यात असलेल्या सुतारपाड या गावी आपल्या कारने वाहतूक करतात. अशाच पद्धतीने कोंबड्या खरेदी करून तक्रारदार हे वांगणी परिसरातून जात असताना पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार मनोज गायकवाड यांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना ‘तू गुटख्याची तस्करी करतो’, असं सांगून ‘तुझ्यावर गुन्हा दाखल करतो’, असं सांगितलं.
Maharashtra TimesTukaram Mundhe News : राजकीय नेत्यांसाठी हे नेहमीचं, पण सरकारी अधिकाऱ्यासाठी विरळ; तुकाराम मुंढेंसाठी गावकऱ्यांनी केलं तरी काय?
त्यांनंतर तक्रादर यांनी ‘आपण अशी कुठलीही तस्करी करत नसून आपला गुजरात राज्यात चिकन शॉपचा व्यवसाय असून त्यासाठी आपण येथून कोंबड्या खरेदी करून गुजरात राज्यात जात असतो, असं सांगून देखील संशयित पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांनी तक्रारदार यांना ‘तू गुटख्याची वाहतूक करतो, आणि तुझ्या इतर गाड्या देखील अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करतात. त्यामुळे तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, असं करायचं नसेल तर तुला पैसे द्यावे लागतील’, असं म्हणून लाचेची मागणी केली.

तडजोड अंती 90 हजार रुपये

त्यानंतर 5 जुलै रविवारी रोजी संशयित गायकवाड यांनी तक्रारदार यांना फोन करून 6 जुलै सोमवार रोजी पेठ येथील तोंडवळ फाटा येथे भेटण्यासाठी बोलावलं. कोंबड्यांची वाहतूक आणि गुटख्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक लाखांची लाच तक्रादारकडे मागण्यात आली. तडजोड अंती 90 हजार रुपये देण्याचं ठरलं. त्यांनंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणी आपली तक्रार नोंदविली होती.
Maharashtra TimesVinayak Raut : ‘…तर आम्ही तीन वर्ष थांबलो नसतो, आमच्या मुलीचा गैरफायदा’; पीडित सुनेच्या आईची मोठी मागणी, काय म्हणाल्या?
त्यांनंतर नाशिकच्या राहू हॉटेलजवळ परिसरात असलेल्या एका चहाच्या दुकानात संशयित मनोज गायकवाड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं संशयित आरोपी पेठ पोलीस ठाणे येथील पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांना रंगेहाथ पकडलं आहे. याबाबत नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याचा असा कारनामा बघून पोलीस दलांत खळबळ उडाली असून, सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा