Nashik Traffic Change: पुढील टप्प्यात सोमेश्वरसह इतर ठिकाणच्या तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून, या काळात पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. मंदिरासह रामकुंडावर होणारी गर्दी विचारात घेता हे बदल करण्यात आले आहेत. शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, दुरुस्ती कामामुळे वाहतूक पूर्णतः खोळंबली आहे. त्यातच श्रावणमासानिमित्त धार्मिक स्थळांजवळ भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने रस्त्यांचे फेरनियोजन केले जात आहे.
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; भेसळीच्या संशयावरुन पावणेतीन लाखांचा तूप साठा जप्त… या तारखांना निबंध
-१५ व १७ ऑगस्ट सकाळी ६ ते रात्री १०
-२२ व २४ ऑगस्ट – सकाळी ६ ते १०
-२९ व ३१ ऑगस्ट – सकाळी ६ ते १०
-५ व ७ सप्टेंबर सकाळी ६ ते रात्री १०
…या मार्गांवर प्रवेश बंद
मालेगाव स्टँडकडून कपालेश्वर मंदिराकडे (रामकुंड) येणारा मार्ग
खांदवे सभागृहाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग
सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग
ढिकले वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग
या चारही मार्गांवरून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल
Maharashtra Companies Closed: महाराष्ट्रात 5 वर्षांत अनेक कंपन्या पडल्या बंद; मुंबई-पुण्यात सर्वाधिक, काय सांगते आकडेवारी?महामार्ग स्थानकातील वाहतुकीत बदल
मुंबई नाका परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महामार्ग बसस्थानकातील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी जारी केले आहेत. त्यामुळे स्थानकात प्रवेश करण्यासह बस बाहेर निघण्यासही स्वतंत्र रस्त्यांची व्यवस्था केली आहे. या बदलाची अंमलबजावणी दि. १९ ऑगस्टपासून होणार असून, याबाबतची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केली आहे. मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, महामार्ग बसस्थानकात साहेबा हॉटेलशेजारून सर्व बस आत जातात आणि त्याच मार्गाने बाहेर येतात. परिणामी मुंबई नाका पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे सहाय्यक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांनी तेथील रस्ते वाहतुकीबाबत बैठक घेतल्यानंतर मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार बससह स्थानकात जाणाऱ्या खासगी वाहनांनाही आता नवीन मार्गांनुसार वाहतूक करावी लागणार आहे.

