Headlines

Nashik Traffic: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! श्रावणानिमित्त रामकुंडालगत प्रवेश बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक, पोलिसांची अधिसूचना जारी – nashik ramkund entry restricted due to shravan maas traffic diverted to alternative routes from 15 august to 7 sept 2026


Nashik Traffic Change: पुढील टप्प्यात सोमेश्वरसह इतर ठिकाणच्या तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-13T161111
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: आज, गुरुवार (दि. १३) पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांलगत वाहतूक नियोजन सुरू असून, कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते शनिवारी आणि सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून, या काळात पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. मंदिरासह रामकुंडावर होणारी गर्दी विचारात घेता हे बदल करण्यात आले आहेत. शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, दुरुस्ती कामामुळे वाहतूक पूर्णतः खोळंबली आहे. त्यातच श्रावणमासानिमित्त धार्मिक स्थळांजवळ भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने रस्त्यांचे फेरनियोजन केले जात आहे.

Maharashtra TimesNashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; भेसळीच्या संशयावरुन पावणेतीन लाखांचा तूप साठा जप्त… या तारखांना निबंध
-१५ व १७ ऑगस्ट सकाळी ६ ते रात्री १०
-२२ व २४ ऑगस्ट – सकाळी ६ ते १०
-२९ व ३१ ऑगस्ट – सकाळी ६ ते १०
-५ व ७ सप्टेंबर सकाळी ६ ते रात्री १०

…या मार्गांवर प्रवेश बंद
मालेगाव स्टँडकडून कपालेश्वर मंदिराकडे (रामकुंड) येणारा मार्ग
खांदवे सभागृहाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग
सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग
ढिकले वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग
या चारही मार्गांवरून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल

Maharashtra TimesMaharashtra Companies Closed: महाराष्ट्रात 5 वर्षांत अनेक कंपन्या पडल्या बंद; मुंबई-पुण्यात सर्वाधिक, काय सांगते आकडेवारी?महामार्ग स्थानकातील वाहतुकीत बदल

मुंबई नाका परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महामार्ग बसस्थानकातील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी जारी केले आहेत. त्यामुळे स्थानकात प्रवेश करण्यासह बस बाहेर निघण्यासही स्वतंत्र रस्त्यांची व्यवस्था केली आहे. या बदलाची अंमलबजावणी दि. १९ ऑगस्टपासून होणार असून, याबाबतची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केली आहे. मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, महामार्ग बसस्थानकात साहेबा हॉटेलशेजारून सर्व बस आत जातात आणि त्याच मार्गाने बाहेर येतात. परिणामी मुंबई नाका पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे सहाय्यक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांनी तेथील रस्ते वाहतुकीबाबत बैठक घेतल्यानंतर मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार बससह स्थानकात जाणाऱ्या खासगी वाहनांनाही आता नवीन मार्गांनुसार वाहतूक करावी लागणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा