Headlines

ठरलं तर मग फेम सायलीनं गायलं ‘जैसे तू है पास मेरे’ गाण, अभिनयासोबतच ही आवडही जपतेय जुई गडकरी; व्हिडिओ व्हायरल


Jui Gadkari Jaise Tu paas mere Song video:मराठी छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता तिनं नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Jui Gadkari Song video
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी हिला अभिनयासोबतच गायनाची देखील आवड आहे. तिनं अनेकदा तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर खास तिच्या आवाजातील गाण्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेतील ‘सायली’ या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या जुईनं नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आणखी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची गायनाची आवड जपताना दिसत आहे.

“जैसे तू है पास मेरे, तेरे पास मैं…”

सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत असलेलं ‘मैं वापस आऊंगा‘ या चित्रपटातील आणि प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं “जैसे तू है पास मेरे, तेरे पास मैं…” हे गाणं जुईनं आपल्या अत्यंत सुरेल आणि शांत आवाजात गायलं आहे.

गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना जुईनं कॅप्शनमध्ये या गाण्याचे अप्रतिम संगीतकार ए. आर. रहमान, गीतकार इरशाद कामिल आणि मूळ पार्श्वगायिका दिपाली सहाय यांना टॅग करत अशा सुंदर कलाकृतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तर या गाण्याच्या काही ओळी देखील तिनं कॅप्शन मध्ये लिहिल्या आहेत.

Maharashtra TimesBatwara 1947 vs Awarapan 2: ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत इम्रान हाश्मीने सनी देओलला टाकलं मागे, ‘आवारापन २’च्या इतक्या तिकीटांची विक्री
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस आणि कौतुकाचा वर्षाव

जुईनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनयासोबतच तिच्या या गायन कौशल्याचं कौतुक नेटकरी करत आहेत. जुई तुझा आवाज गोड आहे, खरंच जुई ताई तू खूप गोड गळ्याची आहेस, अभिनेत्रीसोबतच तू उत्तम गायिकासुद्धा आहेस अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओ खाली वाचायला मिळत आहेत.

Maharashtra TimesSunil Lahri : ‘Gen Z, Gen Alpha ही आपली संस्कृती नाही, पुढच्या पिढीसाठी आपण कोणते शब्द वापरत आहोत?’ ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य

खरं तर जुईला लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड आहे. अनेकदा वेळ मिळेल तसं ती सोशल मीडियावर तिचे गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असते, हे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. जुईच्या आवडीनिवडींमध्ये आता ‘लेखन’ या छंदाचीही भर पडली आहे. नुकतीच तिनं एका वेब सीरिजच्या लेखनाचं कामही पूर्ण केलं. आता ती एक लेखिका म्हणून ती आपली नवी इनिंग सुरू करत आहे.

युट्यूब चॅनेलवरही एन्ट्री

तर इतक सेलिब्रिटींप्रमाणे जुईनं आता युट्यूबवरही एन्ट्री केलीआहे. ती वेगवेगळे ब्लॉग या चॅनेवर शेअर करताना दिसणार आहे.

जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहवरील अव्वल टीआरपी असलेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असून, तिच्यासोबत अभिनेता अमित भानुशाली प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.