Headlines

Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; भेसळीच्या संशयावरुन पावणेतीन लाखांचा तूप साठा जप्त – fda action in nashik ghee stock worth rs 2.75 lakh seized on suspicion of adulteration


म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहर आणि ग्रामीण भागात ‘एफडीए’ने धडक कारवाई करीत विनापरवाना व संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. रविवार पेठेतून पावणेतीन लाख रुपयांचे विविध बँडचे भेसळीचे तूप जप्त करण्यात आले असून, नांदगाव तालुक्यात अस्वच्छ वातावरणात साठवलेले १९६ लिटर दूध थेट नष्ट करण्यात आले आहे.

शहरातील रविवार पेठ येथील संजय भागचंद बुरड यांच्या ठिकाणी १० ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी केली. या वेळी तेथे कोणत्याही प्रकारचा अन्न परवाना नसताना अनधिकृतपणे विविध ब्रँडचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे उघडकीस आले.

Maharashtra TimesAshram School Student Deaths: दोन वर्षांत आश्रमशाळांमध्ये चारशे मृत्यू? राज्यातील 22 प्रकल्पांमधील धक्कादायक स्थितीतूप कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून ‘एफडीए’ने कारवाई करून केएमपी कृष्णा काउ तूप, माधुली काउ तूप, श्रीमायी काउ तूप या तीन ब्रँड्सचा एकूण ३९७.६०० किलो साठा (किंमत रु. २ लाख ७५ हजार ८१२) जप्त केला आहे. याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

नांदगाव तालुक्यात १९६ लिटर दूध नष्ट
ग्रामीण भागात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत ७ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील दूध विक्रेते चंद्रकांत गरुड यांच्याकडे तपासणी करण्यात आली. तेथे विनानोंदणी व्यवसाय सुरू असल्याचे आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात दूध साठवल्याचे आढळले. हे दूध मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने गाईच्या दुधाचे नमुने घेऊन उर्वरित १९६ लिटर दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला.

Maharashtra TimesNashik Crime: 45 वर्षीय महिलेला संपवून बॉडी विहिरीत; नाशिकमधील घटनेला धक्कादायक वळण, 18 वर्षीय संशयित अटकेतआयुर्वेदिक औषधांत त्रुटी

आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत गंभीर त्रुटी आढळल्याने पुणे जिल्ह्यातील तीन कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. या तपासणीत त्रुटी आढळल्याने बारामतीतील कृष्णा हर्बल, पुण्यातील कालिदास गांधी आणि जेजुरीतील इंडुकेअर फार्मा या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली.

तपासणीमध्ये औषध तयार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ कर्मचारी नसणे, औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव आणि उत्पादन परिसर अस्वच्छ आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी कच्चा माल आणि तयार औषधांची तपासणी केली जात नसल्याचेही दिसून आले. तसेच औषध तयार केल्याच्या नोंदी व्यवस्थित नसणे, लेबलवर चुकीचा उत्पादन तारीख नमूद असणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या नोंदी नसणे, अशा त्रुटीही आढळल्या. औषध तयार करताना एका औषधाचा दुसऱ्या औषधात मिसळ होऊ नये, यासाठीही काही ठिकाणी आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले. दरम्यान, एफडीएने राज्यातील ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीए प्रशासनाने सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत