Nashik News: कुमार यांच्याविरुद्ध तीन वर्षांपूर्वी दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील तपासातून हा अपसंपदेच्या पुराव्यांसहित दुसरा गुन्हा ‘सीबीआय’ने नोंदवला आहे.

कुमार यांच्याकडे उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा ११३.५८ टक्के जास्त मालमत्ता आढळली असून, या गुन्ह्यात त्यांची पत्नी व आई यांनाही सहसंशयित केले आहे.
Simhastha Kumbh Mela : 1 हजार 230 कोटींचा निधी, ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर
‘सीबीआय’ने २०२४ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून संशयित अजय कुमार यांच्यावर भ्रष्टाचारासह पदाचा गैरवापर केल्याचा पहिला गुन्हा दाखल केला होता. २०२१ मधील त्यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांच्या संदर्भात ही कारवाई झाली होती. त्या वेळी त्यांच्या घरासह कार्यालयांवर छापे टाकले होते. त्याच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाची चौकशी झाली. तपास यंत्रणेनुसार एक जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीत संशयित कुमार यांच्याकडे ५ कोटी ७२ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. ‘सीबीआय एसीबी’ मुंबईचे उपअधीक्षक रणजित पांडे यांनी त्याबाबत फिर्याद दिली असून, ‘सीबीआय एसीबी’ पुणे येथील उपअधीक्षक गिरीश सोनी तपास करीत आहे.
दोन दिवसांपूर्वी पुणे ‘सीबीआय’मध्ये दाखल गुन्ह्यात कुमार यांच्यासह पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मलादेवी संशयित आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १३(२)सह १३(१)(ई) आणि सुधारित कायदा २०१८ चे कलम १३(१)(ब) आणि भादंवि कलम १०९ अंतर्गत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, संशयित कुमार ‘यूपीएससी’मार्फत ‘इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस’च्या (आयडीईएस) २०१२ च्या तुकडीचे वर्ग एकचे अधिकारी आहेत. नाशिक व बेंगळुरूमधील सेवेनंतर सध्या ते जम्मूत कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस दलात खळबळ! ‘पीआय’सह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; काय आहे 2011मधील बेग्या पवार प्रकरण?
‘सीबीआय’ तपासातून…
तपास कालावधीपूर्वी मालमत्ता (सन २०१४ पूर्वी) : ५२ हजार ४२८ रुपये
तपास कालावधीतील मालमत्ता (सन २०२४ पर्यंत) : ५ कोटी ५९ लाख ६७ हजार ८१५ रुपये
दहा वर्षांतील एकूण मालमत्ता : ५ कोटी ५९ लाख १५ हजार ३८६ रुपये ४४ पैसे
दहा वर्षांतील अधिकृत उत्पन्न : ५ कोटी ४ लाख २८ हजार ९२४ रुपये
दहा वर्षांतील एकूण खर्च : ५ कोटी १७ लाख ९३ हजार ४४ रुपये
दहा वर्षांत अपेक्षित बचत : १३ लाख ६४ हजार १२० रुपये (वजा/तूट)
एकूण बेहिशेबी मालमत्ता : ५ कोटी ७२ लाख ७९ हजार ५०६ रुपये

