Headlines

Nashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं? – six prisoners attack on on duty prison guard at nashik road central jail


Nashik Crime: या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे, धमकावणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-29T125043
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या संचारफेरीवेळी बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने सहा न्यायाधीन बंद्यांनी कर्तव्यावरील कारागृह शिपायाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी (दि. २७) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला. या हल्ल्यात कारागृह शिपाई खाली पडले. त्यानंतरही आक्रमक झालेल्या बंद्यांनी त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

कारागृह शिपाई नितीन अंबादास हेमके यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शुभम शहाराम लोखंडे, रोहित ऊर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर, अविनाश नानाजी उशीरे, अनिल विष्णू रेडेकर, सागर मधुकर गरड आणि अनिकेत विजय सोमवंशी या सहा न्यायाधीन बंद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांनी लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा कारागृह शिपायावर संगनमताने हल्ला झाल्याने कारागृहातील सुरक्षायंत्रणेचा बंद्यांवर धाक राहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Maharashtra TimesSamruddhi Mahamarg Robbery: महामार्गावर चोरट्यांची ‘समृद्धी’; टायर पंक्चरचा सापळा रचून 18 लाख लुटले, वकिलाच्या कुटुंबाला मारहाणनेमके काय घडले?

गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास अधीक्षक अरुणा मुगुटराव यांची यार्ड क्रमांक ५ ते ८ येथे संचारफेरी होणार होती. त्या पार्श्वभूमीवर परिसरात साफसफाई सुरू होती. सर्कल क्रमांक ५ येथे कर्तव्यावर असलेले शिपाई नितीन हेमके यांनी न्यायाधीन बंद्यांना अंघोळ व इतर कामे पूर्ण करून बॅरेकमध्ये जाण्याची सूचना केली. याचा राग आल्याने शुभम लोखंडे याने इतर बंद्यांना एकत्र करून हेमके यांना शिवीगाळ केली. त्यांना खाली पाडून हाताचापट्यांनी मारहाण केली आणि “पुन्हा या सर्कलला ड्युटी घेतली तर बघून घेऊ,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Maharashtra TimesNashik News: आधी गिरीश महाजनांचा टोमणा, नंतर भुजबळांनीकडून सव्याज परतफेड; मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजीपाय सडलेल्या कैद्याचा मृत्यू
पाय सडल्याने औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २७) मध्यरात्री दोन वाजता घडली. प्रवीण मोहनलाल मिस्तरी (वय ५८) असे या घटनेत मयत झालेल्या कैद्याचे नाव आहे. प्रवीण मिस्तरी याच्या डाव्या पायाला जुनी जखम झाल्याने हा पाय सडला होता. त्याला मंगळवारी कारागृह प्रशासनाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पोलिस उपनिरीक्षक बीडकर पुढील तपास करीत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा