Headlines

Naseem Mukri : वडिलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, विचारपूसही नाही, इंडस्ट्रीतील मैत्री अशीच; बिग बींवर सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची नाराजी


Naseem Mukri On Amitabh Bachchan : लोकप्रिय अभिनेते मुकरी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, ज्यावेळी मुकरी यांचं निधन झालं, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी विचारपूसही केली नाही, अशी नाराजी मुकरी यांच्या लेकीनं व्यक्त केली आहे.

Naseem Mukri On Amitabh Bachchan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवंगत अभिनेते मुकरी यांची मुलगी नसीम यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नसीम यांनी खुलासा केला की, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी कधीही भेट दिली नाही किंवा कुटुंबाशी कोणताही संपर्क ठेवला नाही.

नसीम म्हणाल्या की, २००० मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर, अमिताभ बच्चन अंत्यसंस्कारासाठी आले नाहीत किंवा जया बच्चन यांनी कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी फोनही केला नाही. मात्र, ऋषी कपूर त्यांच्या घरी आले होते.
Maharashtra TimesUma Hrishikesh : मासिक पाळीदरम्यान वेदना अन् आजाराचं निदान, करावी लागली शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

नसीम मुकरी यांनी व्यक्त केली खंत

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीम यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळात मेहमूद यांच्या घरी राहायचे. त्यावेळी ते मुकरी यांच्या घरीसुद्धा जायचे. मात्र, परिस्थिती पूर्ण बदलली. नसीम म्हणाल्या की, ‘चित्रपटसृष्टीतील मैत्री अशीच असते. जोपर्यंत तुमची जोडी हिट असते, मग ती नायक-नायिका असो, विनोदी कलाकार असो किंवा खलनायक असो, मैत्री टिकते. पण एकदा काम संपलं की, तुम्ही कोण आहात हे लोक विचारतही नाहीत.’ अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते का, असं विचारलं असता, नसीम यांनी स्पष्टपणे नकार दिला.
Maharashtra TimesCezanne khan : श्वेता तिवारीसोबत अफेअर, म्हणालेला, ‘ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक’, सध्या अभिनेता लाईमलाईटपासून दूर
नसीम यांनी सांगितलं की, जया बच्चनदेखील त्यांच्या वडिलांची चांगली मैत्रीण होती. त्यांनी ‘पिया का घर’ या चित्रपटात एकत्र काम केलेलं. नसीम यांनी सांगितलं की, आउटडोअर शूटिंगच्या वेळी संपूर्ण युनिट एका कुटुंबासारखं राहायचं. असं असूनही, वडिलांच्या निधनानंतर जया बच्चन यांनी कुटुंबाला भेट दिली नाही किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी फोनही केला नाही.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना नसीम म्हणाल्या की, ‘ऋषी कपूर यांनी पहाटे २ वाजता टीव्हीवर वडिलांच्या निधनाची बातमी पाहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता दाराची बेल वाजली. जेव्हा आम्ही दार उघडलं, तेव्हा ऋषी कपूर लहान मुलासारखे दारात रडत उभे होते. बाबांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं, त्यामुळे ऋषी कपूर यांना त्यांच्या निधनाचं दुःख सहन झालं नाही.’
Maharashtra TimesSachin Pilgaonkar : ‘ते जमिनीवर पडलेले’, घनिष्ठ मैत्री, पण शेवटची भेटही नाही; सचिन यांनी सांगितला संजीव कुमारांच्या निधनाचा प्रसंग
दरम्यान, २००० मध्ये मुकरी यांचं वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी ‘मदर इंडिया’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘लवारिस’, ‘शराबी’, ‘कुली’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.