Naseem Mukri On Amitabh Bachchan : लोकप्रिय अभिनेते मुकरी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, ज्यावेळी मुकरी यांचं निधन झालं, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी विचारपूसही केली नाही, अशी नाराजी मुकरी यांच्या लेकीनं व्यक्त केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवंगत अभिनेते मुकरी यांची मुलगी नसीम यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नसीम यांनी खुलासा केला की, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी कधीही भेट दिली नाही किंवा कुटुंबाशी कोणताही संपर्क ठेवला नाही.
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीम यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळात मेहमूद यांच्या घरी राहायचे. त्यावेळी ते मुकरी यांच्या घरीसुद्धा जायचे. मात्र, परिस्थिती पूर्ण बदलली. नसीम म्हणाल्या की, ‘चित्रपटसृष्टीतील मैत्री अशीच असते. जोपर्यंत तुमची जोडी हिट असते, मग ती नायक-नायिका असो, विनोदी कलाकार असो किंवा खलनायक असो, मैत्री टिकते. पण एकदा काम संपलं की, तुम्ही कोण आहात हे लोक विचारतही नाहीत.’ अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते का, असं विचारलं असता, नसीम यांनी स्पष्टपणे नकार दिला. Cezanne khan : श्वेता तिवारीसोबत अफेअर, म्हणालेला, ‘ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक’, सध्या अभिनेता लाईमलाईटपासून दूर नसीम यांनी सांगितलं की, जया बच्चनदेखील त्यांच्या वडिलांची चांगली मैत्रीण होती. त्यांनी ‘पिया का घर’ या चित्रपटात एकत्र काम केलेलं. नसीम यांनी सांगितलं की, आउटडोअर शूटिंगच्या वेळी संपूर्ण युनिट एका कुटुंबासारखं राहायचं. असं असूनही, वडिलांच्या निधनानंतर जया बच्चन यांनी कुटुंबाला भेट दिली नाही किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी फोनही केला नाही.
ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना नसीम म्हणाल्या की, ‘ऋषी कपूर यांनी पहाटे २ वाजता टीव्हीवर वडिलांच्या निधनाची बातमी पाहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता दाराची बेल वाजली. जेव्हा आम्ही दार उघडलं, तेव्हा ऋषी कपूर लहान मुलासारखे दारात रडत उभे होते. बाबांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं, त्यामुळे ऋषी कपूर यांना त्यांच्या निधनाचं दुःख सहन झालं नाही.’ Sachin Pilgaonkar : ‘ते जमिनीवर पडलेले’, घनिष्ठ मैत्री, पण शेवटची भेटही नाही; सचिन यांनी सांगितला संजीव कुमारांच्या निधनाचा प्रसंग दरम्यान, २००० मध्ये मुकरी यांचं वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी ‘मदर इंडिया’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘लवारिस’, ‘शराबी’, ‘कुली’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा