मुंबई : जायबंदी साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी वेळेत फिट होणार नाही. त्यामुळे रविवारी त्याच्याऐवजी डोमेस्टिकचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅचविनरची भारतीय संघात पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. सूत्रांनीही याबाबत दुजोरा दिला होता. बीसीसीआयने मात्र सुदर्शन खेळणार नसल्याची अधिकृत घोषणा रविवारी केली.
गेल्या महिन्यात भारतीय ‘अ’ संघाच्या मालिकेत खेळताना डावखुरा साई सुदर्शन जायबंदी झाला होता. त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्यावर सध्या बीसीसीआय बेंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (सीओई) उपचार सुरू आहेत. सुदर्शनने आपल्या पुनर्वसनात लक्षणीय प्रगती केली असून बीसीसीआयचीवैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे बीसीसीआयने सांगितले.
Team India : जय शहा यांचं ठरलं होतं की द्रविडनंतर लक्ष्मण कोच, मग गंभीरची निवड कशी झाली? VVS लक्ष्मणकडून खुलासा ‘श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने साई सुदर्शनला पर्याय म्हणून सरफराज खानची निवड केली आहे,’ असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘१५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ गॉलला रवाना होण्यापूर्वी सर्फराझ कोलंबीमध्ये भारतीय संघात सामील होईल’, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.
Zaheer Khan : भारतीय संघात पुन्हा कमबॅक करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव’; झहीर खानचा मोहम्मद शमीला कानमंत्र, काय म्हणाला?२८ वर्षीय सरफराजने सहा कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२४मध्ये मुंबईतील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर मात्र तो भारतीय संघापासून दूर आहे. सरफराज खानने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ५२ फर्स्ट क्लास सामन्यात ३९३७ धावा केल्या असून त्याची सरासरी ६९.९३ इतकी आहे. यामध्ये त्याने १४ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या ३०१* आहे. २०२२-२३ च्या रणजी हंगामात त्याने ९ सामन्यात ९२ धावा करत ३ शतके ठोकली होती. लिस्ट A मध्ये २६ सामन्यात ७१० धावा आणि टी-२० मध्ये ५८ सामन्यात ९४६ धावा करत १४६.५१ चा स्ट्राईक रेट त्याने नोंदवला आहे. अशा दमदार कामगिरीमुळेच त्याला “रणजीचा बॉस” आणि “डोमेस्टिकचा रन मशीन” म्हणून ओळखले जाते.
सराव सामन्यात फलंदाज पास; गोलंदाज नापास
परदेशातील मालिकेपूर्वीचा सराव सामना तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचा असतो. मात्र, या सराव सामन्यानंतर भारताच्या फलंदाजांची पूर्वतयारी चांगली झाल्याचे दिसले, तर गोलंदाजांच्या कामगिरीबाबत काही प्रश्न कायम राहिले. पूर्वपरीक्षेसारख्या या सामन्यात फलंदाज उत्तीर्ण ठरले; मात्र गोलंदाज अपेक्षित प्रभाव पाडू शकले नाहीत, मोहम्मद सिराजला २१ षटकांत, तर प्रसिध कृष्णाला १६ षटकांत केवळ एकाच फलंदाजाला बाद करता आले. अकिब नबीला दुसऱ्या डावात पाच षटके गोलंदाजीची संधी मिळाली; मात्र त्याला विकेट मिळाली नाही. सारांश जैनने १५ षटके मारा केला, पण त्यालाही यश मिळू शकले नाही.
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, औकिब नबी, सरफराज खान.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा