Naresh Vijayakrishna Post : दाक्षिणात्य अभिनेते नरेश विजयकृष्णा यांनी इथेनॉल पेट्रोलवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – दाक्षिणात्य अभिनेते नरेश विजयकृष्णा यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या धोरणावर टीका केली आहे. याबद्दल सरकारने योग्य कारवाई न केल्यास सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत फटका बसू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
नरेश यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं की, भाजपा समर्थक असलेल्या त्यांच्या एका मित्राला आपल्या नवीन ‘टोयोटा कॅम्री’ कारचं इंजिन व्हॉल्व्ह बदलण्यासाठी तब्बल साडेतीन लाख रुपये खर्च करावे लागले. इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झाल्यानं हा खर्च करावा लागला.’
Iran vs US : Middle East वर इराणची मोठी कारवाई, 5 Gulf Countries मध्ये धुरळा, Hormuz पुन्हा बंद
नरेश विजयकृष्णा यांची पोस्ट
नरेश यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं की, ‘मी देशद्रोही नाही, पण हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल दुचाकी चालकांपासून ते अलिशान गाड्या वापरणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच हार्ट अटॅक देत आहे. माझ्या एका भाजपा समर्थक मित्राने नुकतीच ‘टोयोटा कॅम्री’ कार घेतली, त्याला या कारचे इंजिनचे व्हॉल्व्ह बदलावे लागले आणि त्यासाठी तब्बल साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. जर असाच प्रकार माझ्या नवीन Porsche Panamera कारबरोबर घडला, तर दुरुस्तीचा खर्च साधारण १२ लाख रुपये येईल. त्यामुळे मला १६५ रुपये प्रति लिटर दराचं ‘हाय ऑक्टेन १००’ पेट्रोल वापरावं लागतंय. पण दुचाकी चालक किंवा इतर सामान्य लोकांचं काय? त्यांच्यासाठी तर हे एक वाईट स्वप्नच आहे.’
‘भाजपाचा एक माजी नेता म्हणून मला माहिती आहे की, पक्षाकडे प्लॅन A, B आणि C बरोबरच एक मजबूत थिंक टँक आहे. परंतु कोट्यवधी लोकांच्या खिशाला झळ पोहोचवून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हा निर्णय नक्कीच अत्यंत घाईचा आणि टोकाचा वाटतोय. पुढील निवडणुकांसाठी अजून दोन वर्षे बाकी आहेत आणि गेल्या निवडणुकीचे निकाल पाहता, ही भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा