Nandurbar teacher absconds in nandurbar fear and anger among parents over student abduction case; शिक्षकानेच केला घात! शाळेतून विद्यार्थिनीला घेऊन झाला फरार
Nandurbar teacher absconds in nandurbar fear and anger among parents over student abduction case; शिक्षकानेच केला घात! शाळेतून विद्यार्थिनीला घेऊन झाला फरार
महेश पाटील, नंदुरबार: शिक्षक-विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नंदुरबार शहरात उघडकीस आली आहे. शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच्याच विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आल्याने पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी शिक्षकास २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षक उमेश अशोक शिंदे हा नंदुरबार शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने त्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला काहीतरी आमिष दाखवून व फूस लावून मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या आईने २८ जानेवारी २०२६ रोजी नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. प्रारंभी अज्ञात इसमाविरोधात अल्पवयीन युवतीस आमिष देऊन पळवून नेल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ३५१, २, ३, ७३ तसेच पोस्को ११२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) संबंधित शिक्षकाला अटक केली. सध्या त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
या प्रकारामुळे शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “ज्यांच्यावर मुलांचा विश्वास असतो, त्यांनीच विश्वासघात केला,” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शिक्षण क्षेत्रातील या गंभीर घटनेमुळे शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा